*कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने मार्फत “ संतुलित खत वापराबाबत जनजागृती” कार्यक्रमाची ऑनलाईन कार्यशाळा संपन्न*

Events

*कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने मार्फत “ संतुलित खत वापराबाबत जनजागृती” कार्यक्रमाची ऑनलाईन कार्यशाळा संपन्न*

श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या वतीने दि.१८ जून २०२१ रोजी संतुलित खत वापराबाबत जनजागृती कार्यक्रमाची कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्यामसुंदर कौशिक वरिष्ठ शास्रज्ञ व प्रमुख यांनी केले. प्रास्ताविकामध्ये शास्त्र शुद्ध पद्धतीने खत वापराबाबत छोट्या छोट्या गोष्टीचा अवलंब करून एकात्मीक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा आपले उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने कृषि विज्ञान केंद्र करीत असलेल्या कार्याचा उल्लेख केला. Continue reading

पोळ/ खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन

Horticulture

पोळ/ खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन
जाती – फुले समर्थ, बसवंत ७८०, अग्रीफाउंड डार्क रेड, एन ५३, अरका कल्याण, भिमा सुपर.
रोपवाटीकेसाठी जागा – रोपवाटिका नेहमी स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी असावी. जागा शक्यतो विहिरीजवळ असावी म्हणजे वेळच्या वेळी पाणी देणे सोपे होईल. लव्हाळा किंवा हरळी यासारखे गवत असणारी तसेच पाणी साचणारी सखल भागाची जमीन रोपवाटीकेसाठी टाळावी. Continue reading

तूर उत्पादन वाढीचे सुधारित तंत्रज्ञान

Agronomy

तूर उत्पादन वाढीचे सुधारित तंत्रज्ञान
प्रस्तावना:
तूर हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे कडधान्य आहे. तुरीचे पिक देशातील सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये घेतले जाते. कडधान्य पिके हि प्रथिनांचे प्रमुख स्रोत आहेत. अशा प्रकारे डाळीमधील प्रथिनांचे मानवी आहारामध्ये अनन्य साधारण महत्व असून मानवाचे शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी फार उपयोगी आहेत. Continue reading

जनावरांच्या खुरांची काळजी घ्या आणि एकूण उत्पादनात वाढ मिळवा

Veterinary

जनावरांच्या खुरांची काळजी घ्या आणि एकूण उत्पादनात वाढ मिळवा
खुरांचे आजार होण्याची संभाव्य करणे –
१. आहारातील प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिज क्षार यांचा असमतोल,
२. अपचन
३. बंदिस्त जागेतील जनावरांचे पालन
५. गोठ्यातील पृष्ठभाव ओबडधोबड असणे
४. व्यायामाचा अभाव Continue reading

खोडवा ऊस पीक संरक्षण

Plant Protection

खोडवा ऊस पीक संरक्षण*
खोडवा पिकामध्ये काणी व गवताळ वाढीचे प्रमाण जास्त आढळते. त्यासाठी अशी काणीग्रस्त बेटे व गवताळ वाढीची बेटे समूळ उपटून नष्ट करावीत.
Continue reading

खरीप हंगाम २०२१ -सोयाबीन पेरणी

Agronomy

श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे
*कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने*
*खरीप हंगाम २०२१ मध्ये शेतकऱ्यांनी स्वतः कडील सोयाबीन बियाणे वापर करावा.*
१) सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील २ वर्षापर्यंत वापरात येते. Continue reading

*कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने मार्फत ‘जागतिक मृदा दिन’ साजरा*

Events

*कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने मार्फत ‘जागतिक मृदा दिन’ साजरा*
खाद्य व कृषि संस्थेमार्फत संपुर्ण जगामध्ये सन २०१५ पासून ‘जागतिक मृदा आरोग्य दिन’ या दिवसाचे आयोजन केले जात आहे. यावर्षी खाद्य व कृषि संस्था यांनी जमीनीचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी एक घोषणा दिली आहे. Continue reading

*शेतकऱ्यांचा सन्मान वाढवणे गरजेचे – डॉ. नरेंद्र घुले पाटील*

Events

*शेतकऱ्यांचा सन्मान वाढवणे गरजेचे – डॉ. नरेंद्र घुले पाटील*
शेतकऱ्यांनी शेतमालाच्या उत्पादनासोबत अधिक नफ्यासाठी शेतमाल विक्रीचे तंत्र अवगत करावे असे आवाहन श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था व श्री.ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख डॉ.नरेंद्र घुले पाटील यांनी केले. ते केव्हीके दहिगाव-ने यांनी आयोजित केलेल्या शास्त्रीय सल्लागार समिती बैठकीच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते. Continue reading

*शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी एकात्मिक पद्धतीचा वापर करावा – कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा*

Events

*शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी एकात्मिक पद्धतीचा वापर करावा – कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा*
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब करावा असे आवाहन महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी चे कुलगुरू डॉ.के. पी. विश्वनाथा यांनी केले.ते केव्हीके दहिगाव-ने यांनी आयोजित केलेल्या शास्त्रीय सल्लागार समिती बैठकीचेप्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेतकरी उत्पादन कंपन्याची स्थापना करावीव आपल्या शेतमालाला योग्य दर मिळवून देऊन प्रगती साधावी, असे कुलगुरू यांनी याप्रसंगी सांगितले. श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे केव्हीके दहिगाव-ने येथे सहाव्या शास्त्रीय सल्लागार समिती सभेचे आयोजन दि.२५ सप्टेंबर २०२० रोजी करण्यात आले होते. कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सभा पार पडली.
शेतकऱ्यांनी शेतमालाच्या उत्पादनासोबत अधिक नफ्यासाठी शेतमाल विक्रीचे तंत्र अवगत करावे असे आवाहन श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था व श्री.ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख डॉ.नरेंद्र घुले पाटील यांनी केले. ते केव्हीके दहिगाव-ने यांनी आयोजित केलेल्या शास्त्रीय सल्लागार समिती बैठकीच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते.कोव्हीड १९ च्या लॉकडाऊन काळामध्ये देखील शेतकऱ्यांनी आपल्या कर्तव्यापासून मागे न हटता अवघ्या देशाला अन्नधान्य पुरवून देश सेवा केली वशेती क्षेत्राचे महत्व जगाला पटवून दिले. म्हणून शेतकऱ्यांचा सन्मान वाढविणे गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी ज्ञानार्जनासाठी डिजिटल तंत्रज्ञाच्या वापराविषयी माहिती करून घेऊन त्याचा उपयोग शेती उत्पन्न वाढीसाठी करणे आता काळाची गरज बनलेली आहेअसे डॉ.नरेद्र घुले पाटील यांनी सांगितले.
या प्रसंगी अटारी पुणे झोन ८ चे शास्त्रज्ञ डॉ.अमोल भालेराव यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी कृषि विज्ञान केंद्राची भूमिका याबद्दल मार्गदर्शन केले.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.शिवाजीराव जगताप यांनी बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये करावयाचे बदल या विषयी विवेचन केले.
बैठकी दरम्यान केव्हीके दहिगाव-ने च्या कामाकाजाबाद्दलचा आढावा वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमख डॉ.एस.एस.कौशिक यांनी दिला तर श्री. माणिक लाखे यांनी कृती आराखड्याचे सादरीकरण केले.
या सभेसाठी संस्थेचे सचिव श्री.काकासाहेब शिंदे, इफको कंपनीचे प्रमुख व्यवस्थापक श्री. डी.बी. देसाई, भारतीय ऊस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.ज्ञानेश्वर बोरसे, रेशीम विभाग अहमदनगर चे सहाय्यक संचालक बी.डी. डेंगळे, मस्त्यपालन विभागाचे श्री.कुडले, म.फु.कृ.वी. राहुरी चे डॉ.भगवान देशमुख, नाबार्ड अहमदनगर चे शिलकुमार जगताप, कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर चे श्री. राठी, जिल्हा बियाणे प्रमाणपत्र अधिकारी अहमदनगर चे डी.एस.बरढे, कृषि अधिकारी श्री. कानिफनाथ मरकड, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.एम.बी.लाड उपस्थित होते. Continue reading

फळ माशी व्यवस्थापन

Plant Protection

फळ माशी व्यवस्थापन
सर्वसाधरणपणे महराष्ट्रात
फळपिकांवर फळमाशीच्या विविध जाती बॅक्‍ट्रोसेरा डॉर्सेलिस, बॅक्‍ट्रोसेरा झोनॅटा, बॅक्‍ट्रोसेरा करेक्‍टा व बॅक्‍ट्रोसेरा टाऊ या चार जाती आढळतात तर फल भाज्या,वेलवर्गीय भाज्या कारली, तोंडली, दोडके, कलिंगड, काकडी इत्यादी पिकांवर बॅक्‍ट्रोसेरा कुकरबीटी ही फळमाशीची जात आढळून आली आहे. या सर्व फळमाश्‍यांचा सुमारे 25 ते 40 टक्के प्रादुर्भाव होतो. Continue reading

केव्हीके दहिगाव-ने येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत महिलांना भाजीपाला बियाणे कीट चे वितरण

Events

केव्हीके दहिगाव-ने येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत महिलांना भाजीपाला बियाणे कीट चे वितरण
श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या वतीने दि.१७ सप्टेंबर २०२० रोजी राष्ट्रीय पोषण अभियान २०२० कार्यक्रम ना. सौ. राजश्रीताई घुले पाटील अध्यक्षा जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड – १९च्या नियमाला अधीन राहून पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितीजभैय्या घुले पाटील हे होते. Continue reading

केसाळ अळी

Plant Protection

केसाळ अळी ही वनस्पतीची/पिकाची पाने खाणारी अळी आहे.
या अळीच्या विविध प्रजाती आढळतात. प्रामुख्याने सोयाबीनवर सूर्य फुलावर स्पिलोसोमा ऑब्लिकव्या, भुईमूगवर अमुस्काटा अल्बिस ट्रायगा, Continue reading

केवडा रोग

Plant Protection

केवडा हा बुरशीजन्य रोग आहे.
केवडा रोगामध्ये (डाउनी मिल्ड्यू) पानांच्या वरील बाजूवर पिवळसरपणा आणि त्या जागी खालील बाजूंवर बुरशीची किंचित फिकट राखी व फिकट जांभळी लवयुक्त वाढ आढळते. Continue reading

उसावरील पांढरी माशी

Plant Protection

सद्य परिस्थितीत उसावर पांढरी माशी या रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
पांढरी माशी या किडीची पिल्ले व प्रौढ दोन्ही पानातील रस शोषण करतात परंतु बाल्यावस्था पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते, या अवस्थेत कीड पानाच्या मागील बाजूने स्थिर राहून पानातील रस शोषण करते, त्यामुळे पान निस्तेज होतात, पिवळी व गुलाबी पडतात आणि कालांतराने वाळू लागतात बर्‍याचदा किड तिच्या शरीरातून करीत असलेल्या चिकट गोड स्त्रावामुळे कॅप्नोडियम बुरशीची पानावर वाढ होऊन पाने काळी पडू लागतात व अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. Continue reading

पाने गुंडाळणारी अळी

Plant Protection

पाने गुंडाळणारी अळी
ओळख:

पीक फुलोऱ्यापासून या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. प्रौढ मादी पतंग पिवळसर रंगाची असते. उभट आकाराची अंडी पुंजक्यात शक्यतो झाडाच्या शेंड्यावर घातली जातात. अळी १४ मि. मी. लांब असून हिरवट पांढरा रंग असलेली शरीराच्या दोन्ही बाजूस काळे ठिपके असलेली अशी असते. कोषावस्था चंदेरी रेशमी जाळ्यांनी विणलेल्या अवस्थेत जमिनीत कीवा गुंडाळलेल्या पानात आढळते. कोष तपकिरी रंगाचे असतात Continue reading

*आले पिकावरील लिफ स्पॉट(पानावरील ठिपके):*

Plant Protection

*आले पिकावरील लिफ स्पॉट(पानावरील ठिपके):*
हा रोग फिलोस्टिक्टा झिंगिबेरी या बुरशीमुळे होतो.
हा रोग पाण्याने भिजलेल्या जखमा सारखा पानावर दिसतो. Continue reading

लाल कुज(रेड पॉट)

Plant Protection

लाल कूज ( Red Rot)
1) हा रोग कोलेटोट्रिकम फलकॅटम या बुरशीमुळे होतो. महाराष्ट्रामध्ये उसावर यारोगाचा प्रादुर्भाव दिसत नाही.

2) प्रथम पानांच्या मध्य शिरेवर रंगहीनठिपके दिसतात.
3) नवीन पाने शेंड्यापासून प्रामुख्याने ३ रे व ४ थे पान पिवळी पडतात व वाळतात. Continue reading

डाळिंबातील मर रोगाचे व्यवस्थापन

Plant Protection

डाळिंबातील मर रोगाचे व्यवस्थापन
प्रतिबंधात्मक उपाय
• डाळिंबाची लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी.
• लागवडीसाठी किंवा रोपे तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीचे सौर निर्जंतुकीकरण करावे.
• मर रोगास प्रतिबंधात्मक उपचार म्हणून उत्कृष्ट प्रकारच्या जैविक मिश्रणांचा अँस्परजीलस नायजर ए.एन. २७, (१किलो प्रति एकर) आणि मायकोरायझा (रायझोकेगस इरेग्युलस, ग्लोमस इरेग्युलँरिस )१ ते ५ किलो प्रति एकर,किवा ट्रायकोडर्मा हरजियानम, सुडोमोनस स्पे. इत्यादीचा वापर रोपांची लागवड केल्यापासूनच दर ६ महिन्यांच्या अंतराने करत राहावा. Continue reading

तूर पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन

Plant Protection

तूर पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन-
हा रोग फ्युजारियम या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव पीक रोपावस्थेत असल्यापासून ते झाडांना फुले व शेंगा येईपर्यंत दिसून येतो. त्यामुळे या कालावधीत या रोगमुळे तूर पिकाचे नुकसान होत असते.
या रोगाची सुरुवात जमिनीत होऊन.
रोगग्रस्त झाडांची पाने पिवळी पडून ती जमिनीकडे झुकतात.
सुरवातीस काही फांद्या आणि नंतर संपूर्ण झाडच वाळून जाते. Continue reading