तूर उत्पादन वाढीचे सुधारित तंत्रज्ञान

Agronomy

तूर उत्पादन वाढीचे सुधारित तंत्रज्ञान
प्रस्तावना:
तूर हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे कडधान्य आहे. तुरीचे पिक देशातील सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये घेतले जाते. कडधान्य पिके हि प्रथिनांचे प्रमुख स्रोत आहेत. अशा प्रकारे डाळीमधील प्रथिनांचे मानवी आहारामध्ये अनन्य साधारण महत्व असून मानवाचे शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी फार उपयोगी आहेत. Continue reading

खरीप हंगाम २०२१ -सोयाबीन पेरणी

Agronomy

श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे
*कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने*
*खरीप हंगाम २०२१ मध्ये शेतकऱ्यांनी स्वतः कडील सोयाबीन बियाणे वापर करावा.*
१) सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील २ वर्षापर्यंत वापरात येते. Continue reading

पाचट आच्छादन करा, सुपीकता वाढवा

Agronomy

एक हेक्‍टर ऊस क्षेत्रातून सुमारे ८ ते १२ टन पाचट मिळते, त्यापासून ५ ते ६ टन सेंद्रिय खत खोडवा पिकाला मिळतेे. पाचटाचे विघटन होत असताना त्यामध्ये असणारे नत्र ४० ते ५० किलो स्फुरद, २० ते ३० किलो व पोटॅश ७५ ते १०० किलो पुढील पिकास उपलब्ध होते


. Continue reading

रब्बी ज्वारीच्या योग्य जाती पेरा

Agronomy, General Awareness

रब्बी ज्वारीच्या योग्य जाती पेरा
रब्बी ज्वारीची उत्पादकता कमी असण्याचे प्रमुख कारण म्हणजे जिरायती पद्धतीने लागवड. अनिश्चित स्वरूपाचा पाऊस, हलकी, मध्यम खोल काळी व भारी जमीन अशी वैविध्यपूर्ण जमिनीत लागवड अशा कारणांमुळेही समाधानकारक उत्पादन मिळत नाही. त्यामुळे लागवडीसाठी महत्त्वाच्या बाबींचा विचार करून नियाेजन केल्यास उत्पादनात वाढ साधता येते.
Continue reading

कर्बवायू साठवणीसाठी करा दक्षिण- उत्तर ऊस लागवड

Agronomy, General Awareness

कर्बवायू साठवणीसाठी करा दक्षिण- उत्तर ऊस लागवड
पूर्व-पश्चिम लागवडीमध्ये कर्बवायू वाहून गेल्याने पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. दक्षिण उत्तर लागवडीमध्ये कर्बवायू अधिक काळ साठून पिकांकडून शोषला गेल्याने उसातील अन्ननिर्मिती प्रक्रिया वेगाने होते. त्याचा फायदा उत्पादनवाढीसाठी होतो. थोडक्यात, ऊस लागवडीची दिशा आणि कर्बवायू साठवण यामधील संबंध सरळ उत्पादन वाढीशी जोडला जातो. Continue reading

जमिन आरोग्य तपासणी काळाची गरज :-श्री. नारायण निबे

Agronomy

जमिन आरोग्य तपासणी काळाची गरज :

कृषिप्रधान भारत देशात ६५ टक्के लोक शेती व शेतीपूरक व्यवसाय करतात. देशाचा विकास शेतकरी व ग्रामीण जनतेच्या आर्थिक उन्नतीवर अवलंबून आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती च्या कार्यक्षम वापरातून शेतीतून उच्च प्रतीचे अधिक उत्पादन काढणे काळाची गरज आहे. त्यासाठी जमीन, पाणी आणि पिकांचे योग्य नियोजन करून त्यास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे फायदयाचे ठरणार आहे. Continue reading

दुष्काळ सदृश परिस्थितीत उस पिक जोपासण्याचे उपाय-श्री. नारायण निबे

Agronomy

कृषि सल्ला :
दुष्काळ सदृश परिस्थितीत उस पिक जोपासण्याचे उपाय:
गेल्या तीन वर्षापासून कमी झालेल्या पावसामुळे उस लागवड व उत्पादनात बऱ्याच प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे. Continue reading

ठिबक सिंचन संचाची देखभाल व निगा:श्री. नारायण निबे

Agronomy

ठिबक सिंचन संचाची देखभाल व निगा:
दिवसेंदिवस कमी होत असलेले पाऊस आणि उपलब्ध पाणी यांचा विचार करता शेतीमध्ये विशेषकरून फळबाग, भाजीपाला, फुलशेती तसेच उसाच्या शेतीमध्ये पाण्याच्या कार्यक्षम वापर होण्याच्या दृष्टीने ठिबक सिंचनाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ठिबक सिंचन संचातून पाण्यात विरघळणारी Continue reading

उन्हाळी भुईमुग लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान -श्री. नारायण निबे, प्रमुख तथा विषय विशेषज्ञ (कृषिविद्या)

Agronomy

उन्हाळी भुईमुग लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान -श्री. नारायण निबे,प्रमुख तथा विषय विशेषज्ञ (कृषिविद्या)
तेलबिया वर्गातील भुईमुग हे एक महत्वाचे पिक असून उन्हाळी हंगामात हे पिक ०.८२४ लाख हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. उन्हाळी भुईमुगाचे उत्पादन १.१९६ लाख टन तर उत्पादकता १४५१ क्विटल प्रति हेक्टर इतकी आहे. Continue reading

अत्यंत कमी पाण्यात खोडवा व्यवस्थापन-श्री. नारायण निबे, कार्यक्रम समन्वयक

Agronomy

अत्यंत कमी पाण्यात खोडवा व्यवस्थापन-श्री. नारायण निबे, कार्यक्रम समन्वयक


हरभरा: एकात्मिक पिक उत्पादन तंत्रज्ञान-श्री. नारायण निबे, कार्यक्रम समन्वयक

Agronomy

हरभरा: एकात्मिक पिक उत्पादन तंत्रज्ञान-श्री. नारायण निबे, कार्यक्रम समन्वयक
महाराष्ट्र राज्यात कडधान्य पिक ३२.७५ लाख हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येत असून हरभऱ्याचे उत्पादन २४.१३ लाख टन तर उत्पादकता ७३७ किलो प्रति हेक्टर आहे(२०१३-१४). कडधान्य पिकांचे मानवी आहारात व शेतीमध्ये अतिशय महत्वाचे स्थान आहे. कडधान्य पिके हि जमिनीचा कस सुधारण्यासाठी व तो टिकवून ठेवण्यासाठी फार उपयोगी पडतात Continue reading

योग्य पद्धतीने करा गहू पिकाचे नियोजन-श्री नारायण निबे , प्रमुख शास्त्रज्ञ केव्हीके दहीगाव

Agronomy

योग्य पद्धतीने करा गहू पिकाचे नियोजन:
खत व्यवस्थापन तंत्रज्ञान:
बागायती गव्हाच्या पिकासाठी २० ते २५ चांगल्या कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. Continue reading

शाश्वत ऊस उत्पादन तंत्रज्ञान- श्री. नारायण निबे

Agronomy

शाश्वत ऊस उत्पादन तंत्रज्ञान- श्री. नारायण निबे , प्रमुख तथा विषय विशेषज्ञ (कृषि विद्या) कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने
मो. ८८०५९८५२०५
शास्वत ऊस उत्पादन तंत्रज्ञान

खोडवा उसाला पहारीने खत कशा पद्धतीने द्यावे?

Agronomy

उसाच्या वाढीसाठी पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने खते दिल्यास इतर पद्धतींपेक्षा अधिक ऊस उत्पादन व आर्थिक फायदा झाल्याचे दिसून आले. Continue reading