Category Archives: Events

*शेतकऱ्यांचा सन्मान वाढवणे गरजेचे – डॉ. नरेंद्र घुले पाटील*

*शेतकऱ्यांचा सन्मान वाढवणे गरजेचे – डॉ. नरेंद्र घुले पाटील*
शेतकऱ्यांनी शेतमालाच्या उत्पादनासोबत अधिक नफ्यासाठी शेतमाल विक्रीचे तंत्र अवगत करावे असे आवाहन श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था व श्री.ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख डॉ.नरेंद्र घुले पाटील यांनी केले. ते केव्हीके दहिगाव-ने यांनी आयोजित केलेल्या शास्त्रीय सल्लागार समिती बैठकीच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते. Continue reading *शेतकऱ्यांचा सन्मान वाढवणे गरजेचे – डॉ. नरेंद्र घुले पाटील*

*शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी एकात्मिक पद्धतीचा वापर करावा – कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा*

*शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी एकात्मिक पद्धतीचा वापर करावा – कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा*
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब करावा असे आवाहन महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी चे कुलगुरू डॉ.के. पी. विश्वनाथा यांनी केले.ते केव्हीके दहिगाव-ने यांनी आयोजित केलेल्या शास्त्रीय सल्लागार समिती बैठकीचेप्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेतकरी उत्पादन कंपन्याची स्थापना करावीव आपल्या शेतमालाला योग्य दर मिळवून देऊन प्रगती साधावी, असे कुलगुरू यांनी याप्रसंगी सांगितले. श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे केव्हीके दहिगाव-ने येथे सहाव्या शास्त्रीय सल्लागार समिती सभेचे आयोजन दि.२५ सप्टेंबर २०२० रोजी करण्यात आले होते. कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सभा पार पडली.
शेतकऱ्यांनी शेतमालाच्या उत्पादनासोबत अधिक नफ्यासाठी शेतमाल विक्रीचे तंत्र अवगत करावे असे आवाहन श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था व श्री.ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख डॉ.नरेंद्र घुले पाटील यांनी केले. ते केव्हीके दहिगाव-ने यांनी आयोजित केलेल्या शास्त्रीय सल्लागार समिती बैठकीच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते.कोव्हीड १९ च्या लॉकडाऊन काळामध्ये देखील शेतकऱ्यांनी आपल्या कर्तव्यापासून मागे न हटता अवघ्या देशाला अन्नधान्य पुरवून देश सेवा केली वशेती क्षेत्राचे महत्व जगाला पटवून दिले. म्हणून शेतकऱ्यांचा सन्मान वाढविणे गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी ज्ञानार्जनासाठी डिजिटल तंत्रज्ञाच्या वापराविषयी माहिती करून घेऊन त्याचा उपयोग शेती उत्पन्न वाढीसाठी करणे आता काळाची गरज बनलेली आहेअसे डॉ.नरेद्र घुले पाटील यांनी सांगितले.
या प्रसंगी अटारी पुणे झोन ८ चे शास्त्रज्ञ डॉ.अमोल भालेराव यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी कृषि विज्ञान केंद्राची भूमिका याबद्दल मार्गदर्शन केले.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.शिवाजीराव जगताप यांनी बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये करावयाचे बदल या विषयी विवेचन केले.
बैठकी दरम्यान केव्हीके दहिगाव-ने च्या कामाकाजाबाद्दलचा आढावा वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमख डॉ.एस.एस.कौशिक यांनी दिला तर श्री. माणिक लाखे यांनी कृती आराखड्याचे सादरीकरण केले.
या सभेसाठी संस्थेचे सचिव श्री.काकासाहेब शिंदे, इफको कंपनीचे प्रमुख व्यवस्थापक श्री. डी.बी. देसाई, भारतीय ऊस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.ज्ञानेश्वर बोरसे, रेशीम विभाग अहमदनगर चे सहाय्यक संचालक बी.डी. डेंगळे, मस्त्यपालन विभागाचे श्री.कुडले, म.फु.कृ.वी. राहुरी चे डॉ.भगवान देशमुख, नाबार्ड अहमदनगर चे शिलकुमार जगताप, कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर चे श्री. राठी, जिल्हा बियाणे प्रमाणपत्र अधिकारी अहमदनगर चे डी.एस.बरढे, कृषि अधिकारी श्री. कानिफनाथ मरकड, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.एम.बी.लाड उपस्थित होते. Continue reading *शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी एकात्मिक पद्धतीचा वापर करावा – कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा*

केव्हीके दहिगाव-ने येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत महिलांना भाजीपाला बियाणे कीट चे वितरण

केव्हीके दहिगाव-ने येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत महिलांना भाजीपाला बियाणे कीट चे वितरण
श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या वतीने दि.१७ सप्टेंबर २०२० रोजी राष्ट्रीय पोषण अभियान २०२० कार्यक्रम ना. सौ. राजश्रीताई घुले पाटील अध्यक्षा जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड – १९च्या नियमाला अधीन राहून पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितीजभैय्या घुले पाटील हे होते. Continue reading केव्हीके दहिगाव-ने येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत महिलांना भाजीपाला बियाणे कीट चे वितरण

केव्हीके दहिगाव येथे कृषि संजीवनी सप्ताहाची सांगता

केव्हीके दहिगाव येथे कृषि संजीवनी सप्ताहाची सांगता
श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे, कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने यांच्या वतीने कृषि संजीवनी सप्ताहाची सांगता व लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या १८ व्या पुण्यस्मरनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी केव्हीके दहिगाव चे वरिष्ट शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. Continue reading केव्हीके दहिगाव येथे कृषि संजीवनी सप्ताहाची सांगता

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन खरीप पिक संरक्षण परिसंवाद संपन्न

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन खरीप पिक संरक्षण परिसंवाद संपन्न
श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने मार्फत दि. ५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन खरीप पिक संरक्षण परिसंवाद आयोजित करण्यात आला.
Continue reading जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन खरीप पिक संरक्षण परिसंवाद संपन्न

रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर या विषयावर जागृती कार्यक्रमाचे आयोजन

रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर या विषयावर जागृती कार्यक्रमाचे आयोजन
दहिगाव ने: दिनांक २२/१०/२०१९ रोजी कृषी विज्ञान केंद्र दहेगाव ने व इंडियन पोटॅश लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने रासायनिक खतांचा कार्यक्षम व योग्य वापर या विषयावरील कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थांन श्री शिंदे काका साहेब, सचिव ,मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था भेंडा,आणि भूषविले तर प्रमुख पाहुणे श्री शिवाजी जगताप जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हे होते . श्री.शेळके एस आर, शास्त्रज्ञ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, श्री देसाई , व इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ.कौशिक एस. एस. प्रमुख कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना खताचा संतुलित वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. Continue reading रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर या विषयावर जागृती कार्यक्रमाचे आयोजन

कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या शास्त्रीय सल्लगार समितीची बैठक संपन्न

कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या शास्त्रीय सल्लगार समितीची बैठक संपन्न
भेंडे :
कृषि विज्ञान केंद्र,दहिगाव-नेच्या शास्त्रीय सल्लगार समितीची बैठकीचे भेंडा येथे दिनांक २८ फेब्रुवारी वार गुरुवार रोजी संपन्न झाली. कृषि विज्ञान केंद्राचे कामकाज श्री . मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ. श्री.नरेंद्र घुले पाटील व मा. आ. श्री. चंद्रशेखर घुले पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चालू असून या बैठीकी दरम्यान कृषि विज्ञान केंद्रामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. कौशिक शामसुंदर आणि त्यांचे इतर सहकारी यांनी शास्त्रीय सल्लागार समितीच्या सदस्यांना अवगत करून दिली.
Continue reading कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या शास्त्रीय सल्लगार समितीची बैठक संपन्न

राक्षी येथे कृषि दिन साजरा

राक्षी येथे कृषि दिन साजरा
राक्षी ता. शेवगाव येथे दि. ०१ जुलै २०१९ या दिवशीच्या कृषि दिनाचे औचित्य साधून कृषि दिन साजरा करण्यात आला. यावेळी गावातील व परिसरातील शेतक-यांना कृषि विज्ञान केंद्राच्या तज्ञांनी शेतीविषयक मार्गदर्शन केले. Continue reading राक्षी येथे कृषि दिन साजरा

केव्हीके दहिगाव-ने येथे कृषि विस्तार सेवकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

केव्हीके दहिगाव-ने येथे कृषि विस्तार सेवकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे, कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने येथे शेवगावतालुका कृषि विभागामध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी, खरीप पिकांचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर दि. ३ जुलै रोजीप्रशिक्षण कार्याक्रामाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सहसचिव श्री. काकासाहेब शिंदे तसेच शेवगाव तालुका कृषि अधिकारी श्री. किरण मोरे व कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. कौशिक हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
Continue reading केव्हीके दहिगाव-ने येथे कृषि विस्तार सेवकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

साकेगाव येथे शेतकरी मेळावा व वृक्षारोपण मोहीम संपन्न-15-9-2019

साकेगाव येथे शेतकरी मेळावा व वृक्षारोपण मोहीम संपन्न-15-09-2019
साकेगाव ता.पाथर्डी येथे कृषी विज्ञान केंद्र दहिगाव-ने यांचे माध्यमातून शेतकरी मेळावा संपन्न झाला. यावेळी उपस्थित शेतक-यांना रब्बी पिके व जलसंधारण याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. याच मेळाव्यामध्ये गावातील शेतक-यांना वृक्ष वाटप करून मोठ्या स्वरुपात मोहिम संपन्न झाली. Continue reading साकेगाव येथे शेतकरी मेळावा व वृक्षारोपण मोहीम संपन्न-15-9-2019

कृषिमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन* या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन *दि. 4 ते 6 सप्टेंबर, 2018*

*सुवर्णसंधी*
कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने मार्फत, ग्रामीण युवक व युवतींसाठी *अन्नप्रक्रिया, कृषिमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन* या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन *दि. 4 ते 6 सप्टेंबर, 2018* रोजी, कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने येथे सकाळी 10.00 ते सायं. 5.00 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.

या तीन दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये खालील विषय समाविष्ट आहेत-

1. बेकरी प्रॉडक्ट्स बनवणे (प्रात्यक्षिकासाहित)
2. जाम जेली कँडी बनवणे(प्रात्यक्षिकासाहित)
3. दुधाचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनवणे (प्रात्यक्षिकासाहित)
4. डाळ मिल प्रकिया उद्योग
5. पॅकिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग

नाव नोंदणी संपर्क-
02429- 272030/ 272020
9822551211 / 8308807001
नोंदणी फी:- रू.२००/-

अन्नप्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन -दि. 20 ते 22 डिसेंबर 2017

*सुवर्णसंधी* *सुवर्णसंधी*

ग्रामीण भागातील तरूण व तरूणींसाठी कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने मार्फत अन्नप्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन *दि. 20 ते 22 डिसेंबर 2017* रोजी, कृषि विज्ञान फार्म भेंडे येथे सकाळी 10.00 ते सायं. 5.00 या वेळेत करण्याचे योजिले आहे.

*या तीन दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये खालील विषय समाविष्ट आहेत-*
1. बेकरी प्रॉडक्ट्स बनवणे (प्रात्यक्षिकासाहित)
2. जाम जेली कँडी बनवणे(प्रात्यक्षिकासाहित)
3. दुधाचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनवणे (प्रात्यक्षिकासाहित)
4. डाळ मिल प्रकिया उद्योग
5. पॅकिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग

*नाव नोंदणी संपर्क-*
02429- 272030/ 272020
9822551211 / 8308807001

*प्रशिक्षणाचा उद्देश-*
◆ मित्रांनो, जगाचा ट्रेंड बघितला तर तुमच्या लक्ष्यात येईल की प्रोसेस्ड फूड (प्रक्रियायुक्त पदार्थ) चा आस्वाद घेण्याची सवय म्हणा किंवा आवड लोकांमध्ये दिसून येते.
◆ त्यामध्ये वेफर्स, बेकरी प्रॉडक्टस जसे केक, पेस्ट्री, ब्रेड, कुकीज तसेच जाम, जेली, कँडी, पनीर, श्रीखंड, आईसक्रीम, सॉस, केच अप, रेडी टू कुक मसाले इ.
ह्या सर्व पदार्थांना प्रोसेस्ड फूड किंवा प्रक्रियायुक्त पदार्थ म्हणतात.
◆ हे पदार्थ बनवायचे असेल तर खूप मोठी मशिनरी किंवा खूप मोठा कारखाना लागतो असे नाही.
◆ हे सर्व पदार्थ बनवण्यासाठी कमी जागा, अत्यल्प भांडवल, स्वस्त तंत्रज्ञान लागते.फक्त आवश्यकता आहे ती तुमच्या हात कौशल्याची व व्यवसाय निर्मितीच्या कौशल्याची.
◆ हे सर्व शिकण्याची संधी कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने तुमच्यासाठी घेऊन येत आहे.

शेळीपालन उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. १८ ते २२ डिसेंबर २०१७

कृषि विज्ञान केंद्र,दहीगाव ने मार्फत शेळीपालन उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. १८ ते २२ डिसेंबर २०१७ दरम्यान ज्ञानेश्वर कृषि विज्ञान फार्म भेंडे येथे करण्यात आले आहे. इच्छुकांनी संपर्क साधा, डॉ. सोमनाथ भास्कर-९८२२६९७६९९, श्री. दत्तात्रय वंजारी-९९२१७४८९१४

जागतिक मृदा दिवस निमित्त कृषि विज्ञान केंद्र दहीगाव ने आयोजित भव्य शेतकरी मेळावा दि. ५/१२/२०१७

जागतिक मृदा दिवस निमित्त कृषि विज्ञान केंद्र दहीगाव ने आयोजित भव्य शेतकरी मेळावा दि. ५/१२/२०१७ मा. आ. नरेंद्रजी घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मा. खा. सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत

Sankalp Se Siddhi –New India Manthan Programme (2017-22)


Sankalp Se Siddhi –New India Manthan Programme (2017-22) organized for doubling the Farmers Income at KVK Dahigaon, Ahmednagar
Sankalp se siddhi programme for doubling the farmers income was organized by Krishi Vigyan Kendra, Dahigaon, Ahmednagar in collaboration of Dyaneshwar Sugar Cooperative Factory and Bayer Crop Science on 24.08.17 at Sai Shraddha Lawns, Kukana, Taluka Newasa, Ahmednagar Maharashtra in the Hon’ble presence of renowned sugarcane specialist and Progressive farmer Krishi Bhushan Mr. Sanjeev Mane, Chief patron of Dyaneshwar Udyog Samooh Sri Narendra Ghule Patil, Shri Abhang Saheb Vice Chairman, Dyaneshwar Sugar Coperative Factory, Bhende, Managing Director of factory Sri Anil Pandit Shivale, General Manager factory Sri Kakasaheb Shinde and honble directors of factory. Continue reading Sankalp Se Siddhi –New India Manthan Programme (2017-22)

कृषि यांत्रिकीकरण या विषयावर तीन दिवसांचे प्रशिक्षण

केव्हीके दहीगाव मार्फत ग्रामीण युवकांसाठी कृषि यांत्रिकीकरण या विषयावर तीन दिवसांचे प्रशिक्षण २७-२८ फेब्रुवारी व १ मार्च २०१७ दरम्यान भेंडे येथे आयोजित करण्यात आले आहे. संपर्क-०२४२९२७२०२०

जागतिक मृदा दिवस व रब्बी हंगाम शेतकरी मेळावा,दि.१२/१२/१६

जागतिक मृदा दिवस व रब्बी हंगाम शेतकरी मेळावा,दि.१२/१२/१६
कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव व ज्ञानेश्वर कारखाना यांचे वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन
दहिगाव/भेंडा – दिनांक १२ डिसेंबर २०१६ रोजी कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव व ज्ञानेश्वर कारखाना यांचे वतीने रब्बी हंगाम शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी रब्बी हंगामातील पिके, ऊस, डाळींब व जमीन आरोग्य व्यवस्थापन याबाबत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सदर मेळाव्यास हजर राहण्याचे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने व ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, भेंडे यांचे वतीने करण्यात येत आहे. Continue reading जागतिक मृदा दिवस व रब्बी हंगाम शेतकरी मेळावा,दि.१२/१२/१६