Category Archives: Plant Protection

फळ माशी व्यवस्थापन

फळ माशी व्यवस्थापन
सर्वसाधरणपणे महराष्ट्रात
फळपिकांवर फळमाशीच्या विविध जाती बॅक्‍ट्रोसेरा डॉर्सेलिस, बॅक्‍ट्रोसेरा झोनॅटा, बॅक्‍ट्रोसेरा करेक्‍टा व बॅक्‍ट्रोसेरा टाऊ या चार जाती आढळतात तर फल भाज्या,वेलवर्गीय भाज्या कारली, तोंडली, दोडके, कलिंगड, काकडी इत्यादी पिकांवर बॅक्‍ट्रोसेरा कुकरबीटी ही फळमाशीची जात आढळून आली आहे. या सर्व फळमाश्‍यांचा सुमारे 25 ते 40 टक्के प्रादुर्भाव होतो. Continue reading फळ माशी व्यवस्थापन

केसाळ अळी

केसाळ अळी ही वनस्पतीची/पिकाची पाने खाणारी अळी आहे.
या अळीच्या विविध प्रजाती आढळतात. प्रामुख्याने सोयाबीनवर सूर्य फुलावर स्पिलोसोमा ऑब्लिकव्या, भुईमूगवर अमुस्काटा अल्बिस ट्रायगा, Continue reading केसाळ अळी

केवडा रोग

केवडा हा बुरशीजन्य रोग आहे.
केवडा रोगामध्ये (डाउनी मिल्ड्यू) पानांच्या वरील बाजूवर पिवळसरपणा आणि त्या जागी खालील बाजूंवर बुरशीची किंचित फिकट राखी व फिकट जांभळी लवयुक्त वाढ आढळते. Continue reading केवडा रोग

उसावरील पांढरी माशी

सद्य परिस्थितीत उसावर पांढरी माशी या रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
पांढरी माशी या किडीची पिल्ले व प्रौढ दोन्ही पानातील रस शोषण करतात परंतु बाल्यावस्था पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते, या अवस्थेत कीड पानाच्या मागील बाजूने स्थिर राहून पानातील रस शोषण करते, त्यामुळे पान निस्तेज होतात, पिवळी व गुलाबी पडतात आणि कालांतराने वाळू लागतात बर्‍याचदा किड तिच्या शरीरातून करीत असलेल्या चिकट गोड स्त्रावामुळे कॅप्नोडियम बुरशीची पानावर वाढ होऊन पाने काळी पडू लागतात व अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. Continue reading उसावरील पांढरी माशी

पाने गुंडाळणारी अळी

पाने गुंडाळणारी अळी
ओळख:

पीक फुलोऱ्यापासून या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. प्रौढ मादी पतंग पिवळसर रंगाची असते. उभट आकाराची अंडी पुंजक्यात शक्यतो झाडाच्या शेंड्यावर घातली जातात. अळी १४ मि. मी. लांब असून हिरवट पांढरा रंग असलेली शरीराच्या दोन्ही बाजूस काळे ठिपके असलेली अशी असते. कोषावस्था चंदेरी रेशमी जाळ्यांनी विणलेल्या अवस्थेत जमिनीत कीवा गुंडाळलेल्या पानात आढळते. कोष तपकिरी रंगाचे असतात Continue reading पाने गुंडाळणारी अळी

*आले पिकावरील लिफ स्पॉट(पानावरील ठिपके):*

*आले पिकावरील लिफ स्पॉट(पानावरील ठिपके):*
हा रोग फिलोस्टिक्टा झिंगिबेरी या बुरशीमुळे होतो.
हा रोग पाण्याने भिजलेल्या जखमा सारखा पानावर दिसतो. Continue reading *आले पिकावरील लिफ स्पॉट(पानावरील ठिपके):*

लाल कुज(रेड पॉट)

लाल कूज ( Red Rot)
1) हा रोग कोलेटोट्रिकम फलकॅटम या बुरशीमुळे होतो. महाराष्ट्रामध्ये उसावर यारोगाचा प्रादुर्भाव दिसत नाही.

2) प्रथम पानांच्या मध्य शिरेवर रंगहीनठिपके दिसतात.
3) नवीन पाने शेंड्यापासून प्रामुख्याने ३ रे व ४ थे पान पिवळी पडतात व वाळतात. Continue reading लाल कुज(रेड पॉट)

डाळिंबातील मर रोगाचे व्यवस्थापन

डाळिंबातील मर रोगाचे व्यवस्थापन
प्रतिबंधात्मक उपाय
• डाळिंबाची लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी.
• लागवडीसाठी किंवा रोपे तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीचे सौर निर्जंतुकीकरण करावे.
• मर रोगास प्रतिबंधात्मक उपचार म्हणून उत्कृष्ट प्रकारच्या जैविक मिश्रणांचा अँस्परजीलस नायजर ए.एन. २७, (१किलो प्रति एकर) आणि मायकोरायझा (रायझोकेगस इरेग्युलस, ग्लोमस इरेग्युलँरिस )१ ते ५ किलो प्रति एकर,किवा ट्रायकोडर्मा हरजियानम, सुडोमोनस स्पे. इत्यादीचा वापर रोपांची लागवड केल्यापासूनच दर ६ महिन्यांच्या अंतराने करत राहावा. Continue reading डाळिंबातील मर रोगाचे व्यवस्थापन

तूर पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन

तूर पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन-
हा रोग फ्युजारियम या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव पीक रोपावस्थेत असल्यापासून ते झाडांना फुले व शेंगा येईपर्यंत दिसून येतो. त्यामुळे या कालावधीत या रोगमुळे तूर पिकाचे नुकसान होत असते.
या रोगाची सुरुवात जमिनीत होऊन.
रोगग्रस्त झाडांची पाने पिवळी पडून ती जमिनीकडे झुकतात.
सुरवातीस काही फांद्या आणि नंतर संपूर्ण झाडच वाळून जाते. Continue reading तूर पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन

काकडी वर्गीय पिकातील पान खाणारे लाल भुंगेरे

काकडी वर्गीय पिकातील पान खाणारे लाल भुंगेरे : 1.ही कीड कारले पीक वगळता इतर सर्व काकडीवर्गीय पिकाचे नुकसान करते. 2.मोठ्या वेलींपेक्षा ती लहान रोपट्यांचे जास्त नुकसान करते. 3.भुंगेरे आपल्या सुप्तावस्थेतून जागे होऊन पिकांवर आक्रमण करतात आणि अधाशासारखे पाने कुरतडून खावयास सुरू करतात. 4.या कीडीच्या अळ्या रोपट्याच्या मुळांचेही नुकसान करतात. तसेच जमिनीच्या सान्निध्यात असलेले दांडे, पाने आणि फळे यांचेही नुकसान करतात. या कीडीच्या अळ्या जमिनीत राहत असल्यामुळे नियंत्रण कठीण होते. Continue reading काकडी वर्गीय पिकातील पान खाणारे लाल भुंगेरे

*तांबेरा* : रोगकारक बुरशी : पुक्‍शीनिया कुहनाय

*तांबेरा* :
रोगकारक बुरशी : पुक्‍शीनिया कुहनाय
कमी जास्त प्रमाणात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांतील या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.
को.सी. ६७१, को. ९४०१२, को.व्ही.एस.आय. ९८०५ या जाती अधिक बळी पडतात.
को. ८६०३२ व फुले २६५ या जातींवरसुद्धा हा रोग दिसून येतो. Continue reading *तांबेरा* : रोगकारक बुरशी : पुक्‍शीनिया कुहनाय

शेंडे करपा

शेंडे करपा – 1.रोगग्रस्त शेंडे काढून नष्ट करावेत.2.पाणी व्यवस्थापन नीट करावे.3. मुळा जवळील साचलेले क्षार जास्तीचे पाणी देऊन निचरा करून घ्यावेत.4. चांगल्या बुरशीनाशकाची एम 45 किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईड 20ग्राम प्रती 10लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी5.पोटॅशियम क्लोराईड 2 टक्केच्या दोन फवारण्या कराव्यात.6.मॅग्नेशियम 0.5टक्के दोन फवारणी करावी

पाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

पाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन.
या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच रोपवाटिकेतील किंवा नवीन लागवड केलेल्या बगीच्यातील कलमांवर असलेल्या अळ्या व कोष वेचून नष्ट कराव्यात.बावची वनस्पती या किडीची पर्यायी खाद्य असल्यामुळे शेतातील बावची वनस्पतीचा नाश करावा. Continue reading पाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

फळ पोखरणारी अळी (सुरसा)

फळ पोखरणारी अळी (सुरसा) : डाळिंबावरील सर्वात महत्वाची ही किड महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आणि सतत कमी अधिक प्रमाणात आढळून येते विशेषतः पावसाळरात (मृग बहारात) ही किड जास्त प्रमाणात असते. Continue reading फळ पोखरणारी अळी (सुरसा)

कॉटन लीफ कर्ल व्हायरस (विषाणू)

कॉटन लीफ कर्ल व्हायरस (विषाणू)
लक्षणे
1) पानांच्या शिरा तुलनात्मकरीत्या गर्द हिरव्या होतात.
2) पानांच्या मागच्या बाजूस जाड भाग निर्माण होतो, झाडाची वाढ खुंटते.
3) पात्या, फुले कमी येतात, पाने द्रोणासारखी होतात. Continue reading कॉटन लीफ कर्ल व्हायरस (विषाणू)

टोळधाड नियंत्रणाची तयारी ठेवा

टोळधाड नियंत्रणाची तयारी ठेवा
टोळ हे तांबुस रंगाचे असतत. ते अत्यंत खादाड असतात. खूप नुकसान करणारा आहे. येत्या काही दिवसात टोळधाड खान्दे डकशातून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.
टोळधाडीचे नियंत्रनाचे उपाय : १.अंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास त्यांच्या पिलांना अटकाव करणे शक्य होवून नियंत्रणात ठेवता येते. Continue reading टोळधाड नियंत्रणाची तयारी ठेवा

फळमाशी नियंत्रणासाठी करा प्रलोभन सापळ्यांचा वापर

सध्या आंब्याला मोहोर येत असून, पुढील टप्प्यामध्ये आंबा फळ तयार होण्यास सुरवात होईल. Continue reading फळमाशी नियंत्रणासाठी करा प्रलोभन सापळ्यांचा वापर