आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच शेती करावी – डॉ. क्षितीज घुले

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच शेती करावी – डॉ. क्षितीज घुले
शेती अधिक फायद्याची करायची असेल तर शेती क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा व आधुनिक शेती शास्त्राचा वापर करावाच लागेल असे मत डॉ. क्षितीज घुले यांनी व्यक्त केले आहे.


कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने ता. शेवगाव व ज्ञानेश्वर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने दहीगाव-ने येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर डॉ. ज्ञानदेवराव हापसे, ज्ञानेश्वर पवार, आत्मा अहमदनगर चे प्रकल्प उपसंचालक संभाजी गायकवाड, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे, मोहनराव देशमुख, काशिनाथ नवले, शिवाजीराव मोरे, रावसाहेब निकम, अनिल हापसे, डॉ. अरुण पवार, मिलिंद कुलकर्णी, संजय कोळगे,सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, कानिफनाथ मरकड, कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने चे प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक ई. मान्यवर उपस्थित होते.
डॉ. क्षितीज घुले पुढे म्हणाले चालू वर्षी जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झालेला आहे. धारणामध्ये पाणी पातळी वाढलेली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके चांगल्या अवस्थेमध्ये आहेत. ऊस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्याकरिता करिता कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने हे उसाची वेग वेगवेगळ्या नवीन वाणांचा पुरवठा करीत आहे. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून युवा शेतकऱ्यांनी आपली फायद्यात आणावी. शेती हा राजधंदा झाला पाहिजे याकरिता सर्वांनी प्रयत्न करणे गरजचे आहे.
यावेळी जेष्ठ ऊस तज्ञ डॉ. ज्ञानदेवराव हापसे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्व मशागती पासून ते ऊस काढणी पर्यंत सविस्तर मार्गदर्शन केले. याचबरोबर जमीन आरोग्याची काळजी घ्या यासाठी कृषि विज्ञान केंद्राकडील माती परीक्षण सुविधेचा लाभ घ्यावा व कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन घ्यावे असे मत त्यांनी मांडले.
यावेळी कृषी मेळाव्यात कृषि विषयक माहिती देणारे विविध प्रकारचे स्टोल यामध्ये माती परीक्षण, पिक संरक्षण, यांत्रिकिकरण, गांडूळखात, ठिबक सिंचन, छोटे ट्रक्टर तसेच ऊस पिकाच्या विविध वाण ई. प्रकारच्या स्टोलची मांडणी करण्यात आली होतो. या मेळ्याव्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीती होते.
यावेळी कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने चे प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर कारखान्याचे सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे यांनी रोपांपासून ऊस लागवडीचे महत्व ऊस बियाणे व रोपे याबद्दलचे ज्ञानेश्वर कारखान्याचे धोरण याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सचिन बडधे यांनी केले.

(more)