ऊसातील पाणी व्यवस्थापन

ऊसासाठी साधारणपणे हेक्टरी ३ कोटी लिटर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पाण्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन हा भाग महत्वाचा ठरतो.


त्यामुळे पाण्याच्या काटेकोर व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करणे महत्वाचे ठरते. कारण ठिबकद्वारे पाहिजे त्या वेळी, पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी देता येते त्यामुळे शेतात कायम वापस स्थिती राखता येते. तसेच खतांचे व्यवस्थापन देखील ठिबकद्वारे करता येते. याउलट पाणी प्रवाही पध्दतीने दिल्यामुळे ऊस पिकला दिलेली खते मुळाच्या कक्षेच्या खाली निघून जातात. आणि पर्यायाने पाणी व खते दोन्हींचा अपव्यप होतो. म्हणून ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते. ठिबक पध्दतीचा अवलंब केल्यामुळे ३०-४०% पाण्याची बचत होते व उत्पादनात १५-२०% ने वाढ होते. ठिबक सिंचन संच बसवण्याचा एकरी खर्च साधारणपणे रु.४०,०००/- ते ४५,०००/- हजार एवढा येतो. (३ ते ४ फुट रुंद सरी, २ फुटावर ४ लि. ड्रीपर ISI मानांकित कंपनी) ऊसाला लागणाऱ्या पाण्याची अवश्यकता ही ऊसाची वाढीची अवस्था व हवामानाचे घटक यावर अवलंबून असते. तरी सर्वसाधारणपणे ४ लिटर ड्रीपर असेल तर गरजेनुसार जानेवारी ते मे महिन्यात ४०-४५ मिनिटे, जून ते जुलै महिन्यात २० ते २५ मिनिटे , ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात १० ते १५ मिनिटे आणि नोव्हेंबर ते डिसेंबर महिनाय्त ३५ ते ४० मिनिटे प्रतिदिन पंप चालवावा. आपल्या भागातील हवामानानुसार पिकाची पाण्याची आवश्यकता व पंप चालवण्याचा कालावधी किती असावा यासाठी गुगल प्ले स्टोअर मधून फुले जल व फुले इरिगेशन शेडूलर हे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करून त्याचा वापर करावा.
प्रवाही पध्दतीने पाणी देण्यासाठी हंगामानुसार उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी , पावसाळ्यात 14 ते १५ दिवसांनी व हिवाळ्यात १८ ते २० दिवसांनी गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

(more)