पशुधन व्यवस्थापनातील महत्वाच्या बाबी – डॉ सोमनाथ भास्कर, विषय विषेशज्ञ, पशुविज्ञान विभाग

अजिबात पशुपालनाची माहीती नसून मोठी रक्कम देऊन जनावर खरेदी करायचे आणि अपेक्षित दुध न मिळाल्यावर दुधाचा धंदा खोटा म्हणणारे आज कमी नाहीत. स्वताःच्या गोठ्यातच जर दुधाळ जनावरे निर्माण केली तर खर यश तिथंच लपलेल असत.
ज्या गोठ्यातली जनावरे त्याच गोठ्यात निर्माण झाली अशा गोठ्यांचे दुधाचे उत्पादन भरपूर असते. जो पशुपालक स्वतःच्या गोठ्यात जनावरे तयार करतो तो भरपूर नफा कमवल्याशिवाय राहत नाही…….

• दुधाळ जनावरे गाभण करा. – भरपुर दुध देणारी जनावरे लवकरात लवकर गाभण करण्याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी चांगले व्यवस्थापन असणे गरजेचे आहे. गाय विल्यानंतर 60 – 90 दिवसात गाभण गेली पाहीजे.ही पशुपैदास तंत्रज्ञानाची पहीली पायरी आहे.
• गर्भ कालवडींची वाढ – ज्या दुधाळ गाई गाभण आहेत त्यांच्या गर्भाची वाढ झपाट्याने व्हावी यासाठी गाईला पोषक खाद्य देणे गरजेचे आहे.गाई कमीतकमी 2 महीने आटवने गरजेचे आहे. गर्भाची 70 % वाढ ही शेवटच्या 2 -3 महीन्यात होत असते त्यामुळे या काळात गाईला पोषक आहार द्यावा.यामुळे जन्माला येणारी वासरे कालवडी सद्रुढ असतील.
• वासरांच्या वाढीवर लक्ष्य ठेवावे. – कालवड जन्मल्यानंतर तिला सर्वप्रथम भरपूर चिक पाजावा त्यानंतर वजनाच्या 10 % दुध पाजने अवश्यक आहे .तसेच वेळोवेळी जंतनिर्मुलन करने यामुळे वासराची वाढ व्यवस्थित होते. नंतर वासरे महीन्याची झाल्यावर त्याना पोषक आहार व चारा दिल्यावर वाढ व्यवस्थित होते. व कालवडी लवकर वयात येतात
• पहील्या माजाचे वय – लवकर वयात व माजावर येणार्या कालवडींकडुन जास्त वेत घेण्याची अपेक्षा करता येते
• पहील्या माजास शरीरवजन – शरीरवजन पुर्ण झाल्यावर कालवडी पहीला माज दाखवतात. त्यावेळेस कालवडीचे वजन हे 250 + किलो असने गरजेचे आहे. तसेच वय कमीत कमी एक वर्षाच्या पुढे असावे.
• पहीला माज रेतनास टाळावा. – कालवडीचे वय वजन जरी व्यवस्थित असले तरीही पहीला माज रेतनास टाळावा . कारण पहीला माज हा विक्रुत असु शकतो . प्रजननचक्र अजूनही व्यवस्थित, नियमित झालेले नसते किंवा दोन माजातील अंतरात नियमितता नसते.
• कालवडींना व्यवस्थित रेतन करणे अवश्यक. – मानसिक व शारीरिक तान तसेच तरून वय त्यामुळे कालवडी चंचल, अस्वस्थ , बैचेन असतात. गर्भाशयामुख अरूंद व कमी उघडलेले असु शकते. त्यामुळे रेतन काळजीपूर्वक करणे अवश्यक असते
• वजन वाढीकडे लक्ष असावे – कालवडींना रेतन केल्यावर 2 महीन्याने गर्भधारणेची खात्री करून घ्यावी. व नंतर कालवडींना सकस व संतुलित आहार द्यावा जेनेकरून कालवडीचे वजनही वाढेल आणि गर्भाशयाची वाढही व्यवस्थित होईल.याच काळात कासेची व गर्भाशयाची जडणघडण होत असते.या गोष्टी विल्यानंतर भरपुर दुध देण्यास कारणीभूत ठरतात.

(more)