आधुनीक दुग्धव्यवसायामध्ये पशुप्रजननाचे महत्व-डॉ श्याम सुंदर कौशिक, डॉ सोमनाथ भास्कर

उत्तम पशुप्रजनन हे आदर्श गोठ्यामधील अनेक सूत्रांपैकी एक आहे. आजच्या वाढत्या महागाईच्या काळात भाकड जनावर किंवा प्रजनन क्षमतेवर बाधा करणा-या बाबी पशुसंवर्धनासाठी परवडणा-या नाहीत.


पशुप्रजननाचे अपूरे ज्ञान, अंधश्रध्दा किंवा पशुपालकांचे दुर्लक्ष यामुळे गोठयातील जनावरांच्या पशुप्रजनन समस्येवर विपरित परिणाम होत असतो. आधुनिक विज्ञानाची कास धरल्यास व थोडीशी याबाबत माहिती करून घेतल्यास शेतकरी व पशुपालकांना निश्चितच फायदा होईल. जनावरांच्या पशुप्रजननावर माहिती देत असतांना अनेक जागृत पशुपालकॉनी पशुप्रश्न विचारले, संबंधित प्रश्न हे वारंवार अनेक शेतक-यांकडून विचारले गेल्याने त्यांच्या काही निवडक प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न या तांत्रिक लेखामधून करण्यात आला आहे. एक मात्र महत्वाचे आहे की, पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार पशुप्रजनन समस्येचे निदान व उपचार होणे आवश्यक आहे. परंतु त्याबरोबर पशुपालकांचीही जबाबदारी पशुप्रजनन उत्तम ठेवण्यासाठी महत्वाची आहे.
जनावर माज दाखवत नसेल
माजावर न येणा-या जनावरांच्या बाबतीत पोटातील जंतनाशकासाठी औषध द्यावीत, तर बाहय परजीवीसाठी औषधाची फवारणी करावी.प्रकृतीस्वास्थ व वजन वाढीसाठी जनावरांना भरपूर, सकस, समतोल आहाराचा पुरवठा करावा.खनिज, क्षार व जीवनसत्वांचा आवश्यक प्रमाणात पुरवठा करावा.
जनावरांना होणारा थंडी, ऊन, पाऊस व हवामानाचा ताण कमी करावा. अशा सहज बाबींकडे लक्ष पुरविल्यास बरीच जनावरे आपोआप माजावर येऊ लागतात. अशाप्रकारे केवळ आहार, प्रकृती व निगा यांच्याबाबतीत काळजी घेतल्यामुळे जनावरांतील माजाचा अभाव टाळता येऊ शकतो. पशुपालकांच्या योग्य देखरेखीनंतर व सर्व उपाय अवलंबल्यानंतर जनावर माजावर न आल्यास त्याची तपासणी पशुवैद्यकाकडून करून घ्यावी.
सांसर्गिक गर्भपाताची कारणे व त्यावरील उपाय
गर्भपात होण्यासाठी रोगजंतूचा प्रभाव किंवा अपघाती कारणे असू गर्भपात होतात आणि सांसर्गिक गर्भपाताचे परिणाम व तीव्रता अधिक होतो. सांसर्गिक गर्भपात कोणत्या कारणामुळे झालेला आहे, त्या रोगजंतूचे लसीकरण करावे. तसेच गर्भपात होऊ नये याकरिता पुढीलप्रमाणे उपाययोजना करावी,
• एखाद्या रोगाचा प्रसार जास्त संख्येमध्ये झाला असल्यास त्यासाठी लसीकरण करून घ्यावे.
• ज्या जनावरांमध्ये गर्भपात झालेला आहे, त्यांच्या रक्ताचे नमूने रोगनिदासाठी पशुवैद्यकाकडून प्रयोगशाळेकडे पाठवावेत व त्यावर योग्य ते उपचार करून घ्यावेत.

वार अडकणे
गाभण जनावरांत गर्भाशय आणि वासरू यांच्यामध्ये जे पडदे तयार कारणे : गर्भाशयाचा आजार, कालावधीपूर्वी प्रसुती, गर्भपात, दिर्घ गाभणकाळ, पहिली प्रसुती, जुळी वासरे, व्यायामाचा अभाव, गर्भाशयास कमी प्रमाण, जास्त ताण असलेले गर्भाशय, वाहतुक, थकवा अशा सर्व कारणात वार गर्भाशयापासून सुटत नाही.
उपाय: प्रसुती झालेल्या जनावरांत वार अडकल्यास तो कापडी पिशवीत राहील, असा शेपटाजवळ करावा. त्यास शेण, गोठयाची माती, इतर घाण, माशा यापासून दूर ठेवावे. जनावरांचा मागचा भाग सतत निर्जतूकीकरण औषधी वापरातून स्वच्छ ठेवावा व पशुवैद्यकाकडून वाराचा भाग रितसर सुटा करणे व त्यास गरजेप्रमाणे ताण व पीळ देवून बाहेर काढणे.
प्रतिबंधात्मक उपचार : गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात ‘अ’ आणि ‘ई’ जीवनसत्व तसेच सेलेनियम क्षारांची इंजेक्सने दिल्यास असा अडथळा कमी प्रमाणात घडतो.प्रसुतीपूर्वी ८-१० दिवस वनस्पतीजन्य/आयुर्वेदिक उपचार केल्यास वार अडकण्यास प्रतिबंध करता येतो.
प्रसुतीपश्चात कासदाह
सड व कास सुजणे, कासेस हात लावल्यावर वेदना होते, कास तपासल्यास ती गरम लागणे, कसेची त्वचा लाल होणे, दुधात पिवळे धागे किंवा घट्टपणा येणे, रक्तमिश्रित दुध येणे, सडांची तोंडे बंद होणे असे प्रकार घडतात. पुढे जनावरांस ताप येणे, खाणेपिणे कमी होणे, कासेला वेदना होणे अशी लक्षणे दिसतात.
गर्भाशयाचा दाहाची लक्षणे व त्यासाठी उपाय
गर्भाशयाचा सौम्य स्वरुपाचा दाह झाल्यास गर्भाशयाची फक्त आतली बाजू सुटते, पूकमी असतो तसेच गर्भाशय मुख बंद होते. प्रसुतीनंतर ८-१० दिवसात स्त्रावाचा लाल रंग बदलून तो पांढरट होणे, जनावर पुन्हा कळा देऊ लागणे, ताप येणे तसेच घट्ट पांढरा पू सतत निरनावाटे दिसून आल्यास तीव्र स्वरुपाचा गर्भाशयाचा दाह होतो.
गावठी गायीमध्ये माजाचा काळ १२ तासांपेक्षा कमी दिसत असेल तर कृत्रिम रेतनाचा काळ
गायीने माजाची लक्षणे दाखविल्यानंतर लगेच करुन घ्यावे.
संकरित गायीमध्ये माजाचा काळ २-३ दिवस असल्यास कृत्रिम रेतनाचा काळ
अशा गायीमध्ये कृत्रिम रेतन दुस-या दिवसी करावे.
उन्हाळयामध्ये म्हशीचा मूका माज
अशा म्हशींच्या कळपामध्ये माज ओळखण्यासाठी एक टोणगा ठेवावा व पशुवैद्यकाच्या मदतीने माजाची तपासणी करून घ्यावी तसेच म्हशीस मोड आलेली धान्ये खाऊ घालावीत. म्हशीला दिवसात ४-५ वेळेस पाण्याने धुवावे किंवा डंबण्यास सोडावे. अशा प्रकारे माजाचे संकलेिणीकरण करून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करून घ्यावे.
मायांग बाहेर पडणे
• मायांग बाहेर पडू नये म्हणून ज्या जनावरांमध्ये यापूर्वी मायांग बाहेर पडलेले आहे. त्यांचे समोरचे पाय मागच्या पायापेक्षा खालच्य पातळीवर राहतील अशाप्रकारे उतारावर ठेवावे.
• बाहेर पडलेल्या मायांगाचा भागाचे निजतुकीकरण करून ध्यावे. जर प्रतिजैविकाचे मलम उदा. सोफ़ामायशिन उपलब्ध असेल तर त्या भागावर लावावे व नंतर लगेच पशुवैद्यकाची मदत घ्यावी.

गार्यींना भाकड बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पध्दती
• दुध पाजणे पूर्णपणे बंद करणे : ही पध्दत कमी दुध उत्पादन देणा-या जनावरांमध्ये उपयोगी आहे. पूर्णपणे दुध काढणे बंद केल्यास तिचे सड थोडे सुजल्यासारखे दिसतात. परंतु १ ते २ दिवसात दुध काढले नसल्यामुळे कास पूर्ववत होऊन गाय/ जनावर भाकड़ होते.
• दुध काढणे अर्धवट बंद करणे : ही पध्दत जास्त दुध देणा-या

कृत्रिम रेतन कशासाठी…
1. कृत्रिम रेतन करतांना गर्भाशयाची तपासणी होते. त्यामुळे वेगळी तपासणी करण्याची गरज नाही.
2. संकरित कालवडी मिळतात.
3. दुध उत्पादकता वाढते.
4. लंगडी किंवा मोडलेली गाय वळूचे वजन सहन करू शकणार नाही व कृत्रिम रेतनाव्दारे ती फळवता येते.
5. कृत्रिम रेतन पध्दतीत वळूचे वीर्य आधी तपासले जात असल्याने अयोग्य वापरले जाण्याची शक्यता राहत नाही.

डॉ सोमनाथ भास्कर एवं डॉ श्याम सुंदर कौशिक
कृषी विज्ञान केंद्र दहिगाव-ने जि.अहमदनगर (महा.)
Email id- kvkdahigaon@gmail.com
Phone No-02429-272020,272030

(more)