चिकू पिकातील फांदीमर, करपा रोगाचे नियंत्रण

चिकू पिकातील फांदीमर, करपा रोगाचे नियंत्रण
चिकू फळपिकात सद्यस्थितीत फांदीमर, पानावरील करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणी पाने व कळ्या खाणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.फांदीमर :
रोगकारक बुरशी : बोट्रीओडीप्लोडीया थिओब्रोमी
लक्षणे : प्रादुर्भावग्रस्त फांद्यांची पाने सुकतात व गळून पडतात. बुरशीचा प्रसार फांदीच्या टोकाकडून मागे पसरत असल्याने फांदी टोकाकडून मरते.

नियंत्रण :
रोगट फांद्या कापून नष्ट कराव्यात. कापलेल्या जागी १० टक्के बोर्डो पेस्ट लावावी.
एक टक्के बोर्डी मिश्रणाची फवारणी करावी.

पानावरील करपा :
लक्षणे : प्रादुर्भावग्रस्त पानांवर तपकिरी चट्टे दिसून येतात. नंतर हे राखेच्या रंगासारखे होतात. पानांची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते. परिणामी उत्पादनात घट येते.
नियंत्रण : फवारणी
बोर्डो मिश्रण – १ टक्का किंवा
कार्बेन्डॅझिम ( ५० टक्के) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी .

पाने आणि कळ्या खाणारी अळी :
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर
क्विनाॅलफाॅस (२५ टक्के) २ मि. लि. किंवा निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा अॅझाडिरॅक्टीन (५०००० पीपीएम) – ०.५ मि.लि.
सूचना : अळीने फांद्यावर तयार केलेली पानांची जाळी आतील अळीसह काढून त्यांचा नाश करावा.

(more)