अन्नप्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन -दि. 20 ते 22 डिसेंबर 2017

*सुवर्णसंधी* *सुवर्णसंधी*

ग्रामीण भागातील तरूण व तरूणींसाठी कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने मार्फत अन्नप्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन *दि. 20 ते 22 डिसेंबर 2017* रोजी, कृषि विज्ञान फार्म भेंडे येथे सकाळी 10.00 ते सायं. 5.00 या वेळेत करण्याचे योजिले आहे.

*या तीन दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये खालील विषय समाविष्ट आहेत-*
1. बेकरी प्रॉडक्ट्स बनवणे (प्रात्यक्षिकासाहित)
2. जाम जेली कँडी बनवणे(प्रात्यक्षिकासाहित)
3. दुधाचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनवणे (प्रात्यक्षिकासाहित)
4. डाळ मिल प्रकिया उद्योग
5. पॅकिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग

*नाव नोंदणी संपर्क-*
02429- 272030/ 272020
9822551211 / 8308807001

*प्रशिक्षणाचा उद्देश-*
◆ मित्रांनो, जगाचा ट्रेंड बघितला तर तुमच्या लक्ष्यात येईल की प्रोसेस्ड फूड (प्रक्रियायुक्त पदार्थ) चा आस्वाद घेण्याची सवय म्हणा किंवा आवड लोकांमध्ये दिसून येते.
◆ त्यामध्ये वेफर्स, बेकरी प्रॉडक्टस जसे केक, पेस्ट्री, ब्रेड, कुकीज तसेच जाम, जेली, कँडी, पनीर, श्रीखंड, आईसक्रीम, सॉस, केच अप, रेडी टू कुक मसाले इ.
ह्या सर्व पदार्थांना प्रोसेस्ड फूड किंवा प्रक्रियायुक्त पदार्थ म्हणतात.
◆ हे पदार्थ बनवायचे असेल तर खूप मोठी मशिनरी किंवा खूप मोठा कारखाना लागतो असे नाही.
◆ हे सर्व पदार्थ बनवण्यासाठी कमी जागा, अत्यल्प भांडवल, स्वस्त तंत्रज्ञान लागते.फक्त आवश्यकता आहे ती तुमच्या हात कौशल्याची व व्यवसाय निर्मितीच्या कौशल्याची.
◆ हे सर्व शिकण्याची संधी कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने तुमच्यासाठी घेऊन येत आहे.