केव्हीके दहिगाव-ने येथे कृषि विस्तार सेवकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

केव्हीके दहिगाव-ने येथे कृषि विस्तार सेवकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे, कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने येथे शेवगावतालुका कृषि विभागामध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी, खरीप पिकांचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर दि. ३ जुलै रोजीप्रशिक्षण कार्याक्रामाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सहसचिव श्री. काकासाहेब शिंदे तसेच शेवगाव तालुका कृषि अधिकारी श्री. किरण मोरे व कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. कौशिक हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

कृषि विज्ञान केंद्राचे कामकाज संथेचे अध्यक्ष मा. आ. डॉ. नरेंद्रजी घुले पाटील व उपाध्यक्ष मा. आ. श्री. चंद्रशेखर घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून कृषि विद्यापीठातील विविध संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम केव्हीके दहिगाव-ने करत आहे. तसेच महाराष्ट्र शासन कृषि विभाग देखील वेगवेगळ्या योजनांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहचविण्याचे काम करत आहे.
कृषि विभागातील विस्तार सेवकांच्या कृषि संबधित ज्ञानात भर होण्यासाठी तसेच शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम जलद व सुलभ व्हावे म्हणून या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात विस्तार सेवकांना खरिप हंगामात घेण्यात येणाऱ्या विविध पिकांबद्दल मार्गदर्शन श्री. सचिन बडधे, श्री. माणिक लाखे, श्री. प्रकाश बहिरट, श्री. राहुल कावळे व श्री. नारायण निबे या केव्हीके दहिगाव-ने च्या शास्त्रज्ञांमार्फतकरण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमास कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक तसेच मंडल कृषि अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार मंडल कृषि अधिकारी श्री. कानिफनाथ मरकड यांनी मानले.

(more)