राक्षी येथे कृषि दिन साजरा

राक्षी येथे कृषि दिन साजरा
राक्षी ता. शेवगाव येथे दि. ०१ जुलै २०१९ या दिवशीच्या कृषि दिनाचे औचित्य साधून कृषि दिन साजरा करण्यात आला. यावेळी गावातील व परिसरातील शेतक-यांना कृषि विज्ञान केंद्राच्या तज्ञांनी शेतीविषयक मार्गदर्शन केले.

श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने यांचे मार्फत संस्थेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीविषयक तंत्रज्ञान प्रसाराचे विविध उपक्रम राबविण्यात येतात. १ जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती असल्याने कृषि दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने खरीप हंगामातील कपाशी, तूर, कांदा व ऊस या पिकाबद्दल राक्षी या ठिकाणी चर्चासत्राचे आयोजन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. श्याम सुंदर कौशिक यांचे मार्गदर्शनाखाली उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे तज्ञ श्री. माणिक लाखे, सचिन बडधे, नंदकिशोर दहातोंडे, इंजी. राहुल कावळे व प्रकाश हिंगे यांनी उपस्थित शेतक-यांना उत्पादन वाढीबद्दल व पीक संरक्षणाबद्दल मार्गदर्शन व शंका समाधान केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी तुकाराम कातकडे हे होते. कार्यक्रमास श्री. किसनराव जुंबड, अनंत सबनीस, सुरेश कर्डिले, रविंद्र धायतडक, प्रकाश मगर, अंकुश बोरजे यांचे समवेत गावातील शेतकरी बांधव हजर होते. कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने प्रत्यक्ष गावामध्ये हजर राहून शेतक-यांना सखोल असे मार्गदर्शन केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने बाजार समितीचे माजी उपसभापती श्री. रतन मगर यांनी आभार व्यक्त केले.

(more)