कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या शास्त्रीय सल्लगार समितीची बैठक संपन्न

कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या शास्त्रीय सल्लगार समितीची बैठक संपन्न
भेंडे :
कृषि विज्ञान केंद्र,दहिगाव-नेच्या शास्त्रीय सल्लगार समितीची बैठकीचे भेंडा येथे दिनांक २८ फेब्रुवारी वार गुरुवार रोजी संपन्न झाली. कृषि विज्ञान केंद्राचे कामकाज श्री . मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ. श्री.नरेंद्र घुले पाटील व मा. आ. श्री. चंद्रशेखर घुले पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चालू असून या बैठीकी दरम्यान कृषि विज्ञान केंद्रामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. कौशिक शामसुंदर आणि त्यांचे इतर सहकारी यांनी शास्त्रीय सल्लागार समितीच्या सदस्यांना अवगत करून दिली.

बैठीकीपूर्वी शास्त्रीय सल्लागार समितीच्या सदस्यांना श्री हिंगे प्रकाश , श्री दहातोंडे नंदकिशोर, श्री प्रकाश बहिरट यांनी शेतकऱ्याच्या शेतावर केंद्राचे चालू असलेल्या उपक्रमांना भेटी देऊन माहिती दिली. सदर सभेसाठी खास अटारी हैद्राबाद येथील माजी शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र रेड्डी उपस्थित राहून केंद्रामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक करत या केंद्राचा उपयोग लहान आणि संसाधनाची कमतरता असलेल्या शेतकऱ्याना होत असल्याचे नमूद केले.
सदर बैठकी दरम्यान, . महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील डॉ. अहिरे, विभाग प्रमुख कृषि विस्तार शास्त्र यांनी कृषि विज्ञान केंद्राने शेतावरील चाचण्या अध्या रेखा प्रात्यक्षिके, प्रशिक्षणे यांचे मार्फत जास्तीत जास्त शास्त्रीय ज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचवून शेतकऱ्याचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी विशेष प्रयत्न करवते असे सूचित केले तसेच विविध उपक्रम राबवताना विद्यापीठाने विकाशित केलेले तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचावावे यावर भर दिला.
नाबार्डचे डीडीएम श्री जगताप साहेब यांनी कृषी विज्ञान केंद्र आणि नाबार्ड यांचा समन्वय अधिक दृढ करून पुढील कामकाज व्हावे असे मत व्यक्त केले. शेतकऱ्याने एकत्र येऊन शेतकरी प्रोडूसर कंपनी स्थापन करावी, नाबार्डच्या मार्फत , मशीन, मधुमाशी यासारखे ४० योजनाचा लाभ शेतकरी घेऊ शकतात त्यासाठी ३६ % सबसिडी नाबार्ड मार्फत दिली जाते. बदलत्या वातावरणात बदलत्या पिक पद्धती साठी, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन अंतर्गत, महिलासाठी प्रशाक्षिणासाठी नाबार्ड मार्फत मदत करते.
सदर बैठकीस आकाशवाणी, अहमदनगर येथील कार्यक्रम प्रमुख श्री टेकाम साहेब यांनी केव्हीके दहीगाव-ने आणि आकाशवाणी यांच्या संयुक्त विद्माने राबवण्यात आलेल्या रेडीओ किसान दिन सारखे उपक्रम घेतल्याचे नमूद करून केंद्राच्या विविध शास्त्रज्ञा मार्फत घेतल्या जात सालेल्या पुढाकाराबाबत समाधान व्यक्त करून पुढील उपक्रमास सुभेच्छा दिल्या.
संस्थेचे सचिवव या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.काकासाहेब शिंदे साहेब यांनी केंद्रामार्फत राबवलेल्या उपक्रमवर समाधान व्यक्त करत या केंद्राचा उपयोग लोकाच्या कल्याणासाठी व्हवा याताचे स्वर्गीय घुले पाटलाचे स्वप्न सत्यात उतरेल असे मत व्यक्त करून केव्हीके सर्व कसोट्यावर खरे उतरेल असा विश्वास व्यक्त केला. कृषि विभाग आणि केव्हीके.यांच्यात असलेल्या समन्वय आणि राबवण्यात येत असलेले उपक्रम याविषयी समाधान व्यक्त करत या केंद्राचा दक्षिण नगर भागातील ताळागाळतील शेतकऱ्यांना होत असल्याचे मत नोंदविले.
प्रगतीशील शेतकरी महिला सौ सुरखा नवथर यांनी मधुमक्षिका चा डाळिंब बागेतील वापर आणि झालेला फायदा या विषयी आपले अनुभव विषद केले .
माजलेशहर येथील श्री अप्पासाहेब फटांगरे यांनी कृषि विज्ञान केंद्राने घेतलेली तूर सोयाबीन , परसबागेतील कुकुटपालन इतियादी तंत्रज्ञान फायदेशीर असून एका कोम्ब्दोपासून ९०० ते १००० रुपय पर्यंतवाढ झाल्याचे सांगितले तेसेच केव्हीके मार्फत राबवत असलेले उपक्रम खरोखरच स्तुत्य आहेत.
प्रगतीशील शेतकरी हुकुम बाबा नवले यांनी शेतकर-याचे उत्पन्न वाढवण्यासाठी मालाचे बाजारभाव स्थिर राहण्यासाठी शासनाकडून मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केलीयाशिवाय शेतकरी प्रतिनिधी मिलिंद नाना कुलकर्णी, गोरक्षनाथ सातपुते,बाळासाहेब मरकड, रेवणनाथ काळे,राजेंद्र मिसाळ,श्रीधर चिमणे, संजय तनपुरे,सतीश विधाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले
सदर कार्यक्रमास केव्हीकेचे शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ भास्कर, राहुल कावळे, प्रविण देशमुख, दत्तात्रय वंजारी, अनिल देशमुख , नगरकर, व श्री संजय थोटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री निबे नारयण यांनी केले तर आभार श्री. माणिक लाखे यांनी मानले

(more)