जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन खरीप पिक संरक्षण परिसंवाद संपन्न

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन खरीप पिक संरक्षण परिसंवाद संपन्न
श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने मार्फत दि. ५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन खरीप पिक संरक्षण परिसंवाद आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुखमार्गदर्शक मा.आ.डॉ. नरेंद्रजी घुले पाटील उपस्थित होते. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सेंद्रिय खते, वृक्ष लागवड, मृदा व जलसंधाराणाचे उपाय, फळबागेसाठी मधुमक्षिकापालन, उद्योग-धंद्याचे स्थानीय विकेंद्रीकरण जेणेकरून शहरीभागातील लोकसंख्या घनतेवर नियंत्रणसाधता येईल व कोव्हीड-१९ सारख्या भविष्यातील विषाणू संसर्ग रोगाचे नियंत्रण करणे सोपे होईल, अशा विविध विषयावर मा.आ. डॉ. नरेंद्रजी घुले पाटील यांनी मार्गदर्शन केले. आय.सी.ए.आर. अटारी झोन-८ पुणे चे संचालक डॉ. लाखन सिंग हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सर्व शेतकरी बांधवांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत, जैव-विविधता, वृक्ष लागवड, मृदा व जलसंधाराणाचे उपाय इ. विषयावरत्यांनी मार्गदर्शन केले. भारतीय ऊस संशोधन संस्था लखनऊ, विभागीय केंद्र प्रवरानगर येथील शास्त्रज्ञ डॉ. योगेश थोरात यांनी हुमणी कीड नियंत्रण, एम.पी.के.व्ही., राहुरी कृषि महाविद्यालय पुणे येथील प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी यांनी टोळ कीड जनजागृती,तर लष्करी अळी व्यवस्थापन या विषयावर केव्हीके दहिगाव-ने चे पिकसंरक्षण शास्त्रज्ञ श्री. माणिक लाखे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्तविका दरम्यान केव्हीके दहिगाव-ने मार्फत चालू असलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच जैविक खते व जैविक कीडनाशके यापासून होणारे फायदे व त्यांचा पर्यावरणास पूरक वापरया बद्दल माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस.एस. कौशिक यांनी दिली. या कार्यक्रमासाठी श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे सचिव श्री. अनिल पंडित शेवाळे, सहसचिव श्री. काकासाहेब शिंदे, केव्हीके दहिगाव-ने चे सर्व शास्त्रज्ञ, लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर स.सा.कारखान्याचे अध्यक्ष मा.आ.श्री.चंद्रशेखर घुले पाटील, उप-अध्यक्ष मा.आ.श्री.पांडूरंग अभंग, संचालक श्री.काशिनाथ नवले, विविध कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी व पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सचिन बडधे यांनी केले तर आभार इंजी. राहुल कावळे-पाटील यांनी मानले.

(more)