टोळधाड नियंत्रणाची तयारी ठेवा

टोळधाड नियंत्रणाची तयारी ठेवा
टोळ हे तांबुस रंगाचे असतत. ते अत्यंत खादाड असतात. खूप नुकसान करणारा आहे. येत्या काही दिवसात टोळधाड खान्दे डकशातून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.
टोळधाडीचे नियंत्रनाचे उपाय : १.अंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास त्यांच्या पिलांना अटकाव करणे शक्य होवून नियंत्रणात ठेवता येते.


२.नीम तेल प्रति हेक्टरी 2.5 लिटर फवारणी करावी,
३.स्पीकर , काठवट, पराती डब्बे, थाळ्या, ढोल, वाजून, आवाज करून टोळ आपले शेतातून पळवून लावावेत .
४.रासायनिक. कीटकनाशकांचा वापर करावयाचा झाल्यास मिथील पॅराथीआन 2 टक्के भूकटी 25 ते 30 किलो प्रति हेक्टरी धुरळणी करावी, बेंडीओकार्ब 80 डब्ल्युपी, क्लोरोपायरीयाफॉस 20 ईसी, 50 ईसी, डेल्टामेथ्रीन 2.8 युएलव्ही, डायफ्लुबेंझुरॉन 25 ईसी, लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 5 ई.सी व 10 डब्लूपी, मॅलाथिऑन 50 ईसी, 25 ईसी व 95 युएलव्ही या किटकनाशकांची टोळ नियंत्रणासाठी शिफारस अलिकडेच केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोदणी समितीने केलेली आहे

(more)