कॉटन लीफ कर्ल व्हायरस (विषाणू)

कॉटन लीफ कर्ल व्हायरस (विषाणू)
लक्षणे
1) पानांच्या शिरा तुलनात्मकरीत्या गर्द हिरव्या होतात.
2) पानांच्या मागच्या बाजूस जाड भाग निर्माण होतो, झाडाची वाढ खुंटते.
3) पात्या, फुले कमी येतात, पाने द्रोणासारखी होतात.

एकात्मिक रोग नियंत्रण व्यवस्थापन
1) रोगग्रस्त झाडे त्वरित उपटून जाळून नष्ट करावी.
2) सिंथेटिक पायरेथ्रॉईड्‌स गटातील (उदा.- सायपरमेथ्रीन) कीटकनाशकांचा वापर टाळावा.
3) पांढऱ्या माशीला बळी पडणाऱ्या पिकांचा कपाशीमध्ये आंतर किंवा मिश्र पीक म्हणून लागवड करू नये.
4) नत्रयुक्त खतांचा अवास्तव वापर टाळावा.
5) भेंडी पिकावर हा रोग येत असल्याने या पिकाची लागवड कपाशीच्या क्षेत्राजवळ करणे टाळावे.
6) रस शोषण करणाऱ्या पांढऱ्या माशी सारख्या किडीचे नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी

(more)