फळ पोखरणारी अळी (सुरसा)

फळ पोखरणारी अळी (सुरसा) : डाळिंबावरील सर्वात महत्वाची ही किड महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आणि सतत कमी अधिक प्रमाणात आढळून येते विशेषतः पावसाळरात (मृग बहारात) ही किड जास्त प्रमाणात असते.

या किडीच्या अळया फळे पोखरून आतील भाग खातात व त्यांची विष्ठा फळाच्या पृष्ठभागावर आलेली दिसते. फळामध्ये इतर बुरशी व जीवाणुंचा शिरकाव होवून फळे कुजतात. या किडीचा प्रादुर्भाव फुले लागण्याच्या वेळेस सुरू होतो. म्हणून या किडीचे व्यवस्थापनाच्या दुष्टीने फुलोर्याच्या अवस्थेपासून सुरूवात केली असता नियंत्रण चांगले होते.
नियंत्रणाकरीता उपाय :
1.शक्यतो एकच बहार घेणे चांगले, इतर अवेळी येणारी फुले / फळे तोडून नष्ट करावीत.
2.मृग बहार घेणे शक्यतो टाळावे.
3.फुले लागण्यास सुरूवात झाल्यानंतर किटकनाशकाची 15 दिवसांच्या अंतराने स्टिकरसह मिसळून दोन वेळा फवारणी करावी. अंडीनाशक गुणधर्म असलेल्या किटकनाशकाचा वापर करणे फायद्याचे
4.निंबोळी अर्क 5% फवारणी करावी.

(more)