पाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

पाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन.
या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच रोपवाटिकेतील किंवा नवीन लागवड केलेल्या बगीच्यातील कलमांवर असलेल्या अळ्या व कोष वेचून नष्ट कराव्यात.बावची वनस्पती या किडीची पर्यायी खाद्य असल्यामुळे शेतातील बावची वनस्पतीचा नाश करावा.

बेसीलस थुरीन्जीएन्सीस 0.05% तीव्रतेची फवारणी केल्याने किडीचा चांगला बंदोबस्त होतो.ट्रायकोग्रामा ईवानसेन्स आणि टेलीनॉमस स्पेसीज या परोपजीवी कीटकांचा उपयोग जैविक कीड नियंत्रणसाठी करता येईल.या किडीच्या अळीला पिवळी गांधील माशी व प्रार्थना कीटक हे परभक्षक किडी खातात. त्यामुळे या नैसर्गिक किडींचे संवर्धन करावे.निंबोळी 5 अर्कची किंवा निम तेल 100 मिली प्रति 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.या किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेल्यास क्विनॉलफोस 20 टक्के ईसी-20 मिली या कीटकनाशकाची फवारणी 10 लिटर पाण्यात मिसळून करावी.

(more)