*तांबेरा* : रोगकारक बुरशी : पुक्‍शीनिया कुहनाय

*तांबेरा* :
रोगकारक बुरशी : पुक्‍शीनिया कुहनाय
कमी जास्त प्रमाणात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांतील या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.
को.सी. ६७१, को. ९४०१२, को.व्ही.एस.आय. ९८०५ या जाती अधिक बळी पडतात.
को. ८६०३२ व फुले २६५ या जातींवरसुद्धा हा रोग दिसून येतो.


सुरवातीस बुरशीची लागण पानाच्या दोन्ही बाजूस होते. पानावर लांबट पिवळे ठिपके दिसतात. त्यांची लांबी वाढून रंग लालसर तपकिरी होतो. ठिपके मोठे होऊन नारंगी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात. ओलसर दवबिंदूंच्या वातावरणात त्यांचा प्रसार होतो.
ठिपक्‍यांमुळे पेशीद्रव्यपटल मृत होते. परिणामी प्रकाश संश्‍लेषण क्रियेत मंदावून ऊसवाढीवर विपरीत परिणाम होतो.
*उपाययोजना* :
1.निरोगी व प्रमाणित, केलेले, योग्य वयाचे बियाणेलागवडीसाठी वापरावे. 2.खोडवा उसाचे बेणे लागणीसाठी टाळावे.
3.वेळेवर आंतरमशागत करवी. 4.शिफारशीत रासायनिक खतमात्रा मती परीक्षणानुसार द्यावी.
5.हा रोग हवेमार्फत पसरतो त्यामुळे या रोगांपासून ऊस पिकाच्या संरक्षणासाठी सिलिकॉन व पोटॅश दोन या मूलद्रव्याची उपलब्धता वाढवावी. 6.सिलिकॉन व पोटॅश उपलब्धतेसाठी प्रतिहेक्‍टरी १.५ टन बगॅस राख वापरावी. 7.सिलिकेट व पोटॅश विरघळविणाऱ्या जीवाणूंचे खत २.५ लिटर या प्रमाणात वापर करावा.
8.एकरी ९ किलो सिलिकॉनयुक्त खतांच्या वापराने उसातील रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
9.पीक वाढीच्या शेवटच्या अवस्थेत 0:0:50 या रासायनिक खताचा ठिबक द्वारे द्यावेत.
10.गरज भासल्यास फवारणी साठी प्रोपिकोनॅझोल १ मि.लि किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम प्रति 10लिटर पाण्यातून वापरावे.

(more)