काकडी वर्गीय पिकातील पान खाणारे लाल भुंगेरे

काकडी वर्गीय पिकातील पान खाणारे लाल भुंगेरे : 1.ही कीड कारले पीक वगळता इतर सर्व काकडीवर्गीय पिकाचे नुकसान करते. 2.मोठ्या वेलींपेक्षा ती लहान रोपट्यांचे जास्त नुकसान करते. 3.भुंगेरे आपल्या सुप्तावस्थेतून जागे होऊन पिकांवर आक्रमण करतात आणि अधाशासारखे पाने कुरतडून खावयास सुरू करतात. 4.या कीडीच्या अळ्या रोपट्याच्या मुळांचेही नुकसान करतात. तसेच जमिनीच्या सान्निध्यात असलेले दांडे, पाने आणि फळे यांचेही नुकसान करतात. या कीडीच्या अळ्या जमिनीत राहत असल्यामुळे नियंत्रण कठीण होते.


नियंत्रणाचे उपाय
1.ही कीड सकाळी संथ असते, तेव्हा पसरट भांड्यात रॉकेलमिश्रित पाणी घेऊन त्यात प्रौढ भुंगेरे टाकावेत.
2. जुन्या वेली जाळून टाकाव्यात,
3.शेताची स्वच्छता ठेवावी .4.निंबोळी युक्त कीटक नाशकाची 5टक्के ची फवारणी करावी .5. आवश्यकता भासल्यास रासायनिक कीटकनाशकांचा फवारणी करावी.

(more)