तूर पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन

तूर पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन-
हा रोग फ्युजारियम या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव पीक रोपावस्थेत असल्यापासून ते झाडांना फुले व शेंगा येईपर्यंत दिसून येतो. त्यामुळे या कालावधीत या रोगमुळे तूर पिकाचे नुकसान होत असते.
या रोगाची सुरुवात जमिनीत होऊन.
रोगग्रस्त झाडांची पाने पिवळी पडून ती जमिनीकडे झुकतात.
सुरवातीस काही फांद्या आणि नंतर संपूर्ण झाडच वाळून जाते.


खोडाचा व मुळाचा आतील भाग काळा पडतो आणि मर झालेल्या खोडावर तांबूस रंगाचे पट्टे दिसतात
नियंत्रण : पेरणीपूर्वी
उन्हाळ्यामध्ये शेताची खोल नांगरट करावी.
रोगग्रस्त झाडे उपटून टाकावीत व नष्ट करावीत.
तुरीमध्ये ज्वारी, बाजरी, मका यासारखी अंतर पीके घ्यावीत.
विपुला, बी.एस.एम.आर. – ८५३, बी.एस.एम.आर.-७३६, सी-११, आशा रोगप्रतिकारक्षम वाणांची पेरणी करावी.
पेरणी पूर्वी ट्रायकोडर्मा ६ ग्राम/कि. किंवा कार्बेनन्डॅझीम २ ग्रॅम/कि. बियाण्यास चोळावे.
पेरणी नंतर
शेतात साठलेले पाणी निचरा करून घ्यावे.
रोगग्रस्त झाडांना कॉपर ऑक्सी क्लोराईड 20 ग्रॅम प्रति 10लिटर पाण्यातून आळवणी द्यावी.
त्यानंतर ट्रायकोडरमा 2किलो 40ते50किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून ओ लाव्यवर मर होत असलेल्या झाडांना अळे पाधितीने घालावे.
शेतातील जादा पाण्याचा निचरा करावा.
पाण्याचा अती ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.तूर पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन

(more)