डाळिंबातील मर रोगाचे व्यवस्थापन

डाळिंबातील मर रोगाचे व्यवस्थापन
प्रतिबंधात्मक उपाय
• डाळिंबाची लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी.
• लागवडीसाठी किंवा रोपे तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीचे सौर निर्जंतुकीकरण करावे.
• मर रोगास प्रतिबंधात्मक उपचार म्हणून उत्कृष्ट प्रकारच्या जैविक मिश्रणांचा अँस्परजीलस नायजर ए.एन. २७, (१किलो प्रति एकर) आणि मायकोरायझा (रायझोकेगस इरेग्युलस, ग्लोमस इरेग्युलँरिस )१ ते ५ किलो प्रति एकर,किवा ट्रायकोडर्मा हरजियानम, सुडोमोनस स्पे. इत्यादीचा वापर रोपांची लागवड केल्यापासूनच दर ६ महिन्यांच्या अंतराने करत राहावा.

• पावसाळ्यामध्ये हिरवळीच्या खतांची म्हणजेच धैंचा (सेसबानिया अँक्युलाटा) आणि ताग (क्रोटालारिआ जुनेका) यांची पेरणी करून, फुलोरा अवस्थेत जमिनीत गाडावीत.
• माती परीक्षण अहवालानुसार झाडांना बोरॉन बरोबरच इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा द्यावी.
• बागेतील रोगग्रस्त झाड व सदृढ झाड याच्यामध्ये ३ ते ४ फूट लांबीचा चर खोदावा व रोगट झाडांचे विलगीकरण करावे.
• रोगग्रस्त झाड मुळासकट उपसून काढून बागेपासून दूर अंतरावर नेऊन नष्ट करावे.
• मर रोगग्रस्त झाड काढल्यानंतर फॉर्मेलीन कीव सोडियम हायपोक्लोराईड (५%) द्रावण पाण्यामध्ये मिसळून त्या खड्ड्यांच्या आतील चौहोबाजूला व्यवस्थित ओतावे. त्यावर प्लॅस्टिकचे आच्छादन टाकून १ आठवड्याकरिता हवाबंद झाकून ठेवावे.
• मर रोगाची प्राथमिक लक्षणे दिसताच क्षणीच मुख्य खोडाच्या चोहोबाजूंनी मुळे असणाऱ्या भागांमध्ये डबल रिंग पद्धतीने तातडीने आंतरप्रवाही बुरशीनाशकाचे ड्रेंचिंग करावे.
• त्याचबरोबर रोगग्रस्त झाडाच्या चोहोबाजूंची ४ ते ५ झाडांनासुद्धा रसायनांचे प्रतिबंधात्मक ड्रेंचिंग करावे.
• झाडांची छाटणी झाल्यानंतर छाटलेल्या भागांवर १०% बोर्डो पेस्टचा लेप द्यावा. पावसाळी वातावरणात बोर्डोपेस्टमध्ये नीम तेल ५० मिलि. प्रति लिटर या प्रमाणे वापरावे.
नियंत्रणात्मक उपाययोजना
झाडांवर मर रोगाची प्राथमिक रोगाची लक्षणे आढळल्यास योग्य त्या कारणांचा शोध घ्यावा.
सिराटोसीस्टीस, फ्युजारीअम यांसारख्या बुरशींचा प्रादुर्भाव आढळल्यास
1. पहिली आळवणी प्रॉपीकोनाझोल (२५ ईसी) २ मिलि. + क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २ मिलि. प्रति लिटर पाणी.
2.दुसरी आळवणी, अँस्परजिलस नायजर (ए.एन. २७) ५ ग्रॅम अधिक शेणखत २ किलो प्रति झाड या प्रमाणे करावी.
3. तिसरी आळवणी मायकोराइझा (रायझोफँगस इरेग्युलँरीस एस. वाय. ग्लोमस इरेग्युलँरीस) २५ ग्रॅम अधिक शेणखत २ किलो प्रति झाड याप्रमाणे करावी, प्रत्येक आठवणीत साधारण 30 दिवसाचे अंतर ठेवावे.
गरज असल्यास आळवणी साठी फोसेटिल ए.एल.( ८०% डब्लु.पी.) ६ ग्रॅम प्रति झाड आणि टेब्युकोनॅझोल (२५.९% ईसी) ३ मिलि प्रति झाड याप्रमाणे १० लिटर पाण्यात मिसळून वापरावे.
फायटोफ्थोरा बुरशीच्या प्रादुर्भावामुळे मुळकुज खोडकुज आढळून येत असल्यास
• मेटालॅक्झील (८%) अधिक मँन्कोझेब (६४%) २ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे ड्रेंचिंग करावे.
• आळवणी करण्यापूर्वी बागेला एक दिवस आधी व्यवस्थित पाणी द्यावे. ड्रेंचिंग केल्यानंतर बागेला किमान दोन दिवस पाणी सोडू नये.
• खोड भुंगेऱ्यांच्या (शॉट होल बोरर) नियंत्रणाकरिता
• गेरू/लाल माती ४ किलो अधिक क्लोरपायरिफॉस (२० इसी) २० मिलि अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे मलम तयार करून दोन वर्षांहून अधिक वयाच्या झाडाच्या खोडावर जमिनीपासून २ फूट अंतरापर्यंत व्यवस्थितरीत्या लेप द्यावा.
• बहार धरतेवेळी पानगळ केल्यानंतर आणि फळतोडणी झाल्यानंतर त्वरीत वरील मिश्रणाचा लेप अवश्य द्यावा.
• खोड भुंगेऱ्यांच्या प्रादुर्भाव हा कमजोर झाडावर होतो. झाडे सशक्त करण्यासाठी झाडांना अन्नद्रव्ये व पाणीपुरवठा नियमित करावा.
• खोड भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव झालेल्या फांद्या छाटून काढाव्यात. त्या
• बागेपासून दूर अंतरावर नेऊन नष्ट कराव्यात.
• सूत्रकृमींमुच्या नियंत्रणाकरिता
• शेणखतासोबत पॅसिलोमायसीस प्ललासीनस ४ ते ५ किलो प्रति एकर, अॅस्परजिलस नाइजर (ए.एन.२७) १ किलो प्रति एकर, मायकोरायझा १ ते ५ किलो प्रति एकर अशा उपयुक्त जिवाणूंचा वापर करावा. या जिवाणूंचा वापर कुजलेले शेणखत किंवा गांडूळखतामध्ये मिसळून लागवडीपासून दर ६ महिन्यांच्या अंतराने केल्यास सूत्रकृमींवर नियंत्रण मिळण्यास मदत होते.
• त्याचबरोबर अॅझाडिरेक्टीन (१%) ३ मिलि प्रति लिटर या प्रमाणातील द्रावणाची वर्षातून किमान दोन वेळा ड्रेंचिंग करावी.
• बागेतील दोन झाडांमधील अंतरामध्ये आफ्रिकन झेंडू(टँजेटस इरेक्टा) उदा. पुसा नारंगी आणि पुसा बसंती अशा जातींची लागवड करावी. उत्तम परिणामाकरिता झेंडूंची वाढ ५ ते ६ महिन्यांपर्यंत होऊ द्यावी.
• सूत्रकृमीनाशक प्ल्युन्झल्फान (४८० ईसी) ४० ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात सुरवातीच्या अवस्थेमध्ये केल्यास सूत्रकृमीवर प्रभावी नियत्रंण मिळवता येऊ शकते.
• हिरवळीची खत पिके उदा. ताग, धैंचा ही सापळा पीक म्हणून फायदेशीर ठरतात

(more)