खोडवा ऊस पीक संरक्षण

Plant Protection

खोडवा ऊस पीक संरक्षण*
खोडवा पिकामध्ये काणी व गवताळ वाढीचे प्रमाण जास्त आढळते. त्यासाठी अशी काणीग्रस्त बेटे व गवताळ वाढीची बेटे समूळ उपटून नष्ट करावीत.

👉मार्च-एप्रिलमध्ये तुटलेल्या ऊसाचा खोडवा ठेवल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. खोडवा ऊसामध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३७५ मि.लि. किंवा क्लोरपायरीफॉस (२० इसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. अन्यथा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (०.४ जीआर) ७.५ किलो किंवा फिप्रोनिल (०.३ जीआर) १० किलो प्रति एकर प्रमाणे जमिनीत वाफसा असताना समप्रमाणात मिसळून द्यावे.
👉 *हुमणीच्या नियंत्रणासाठी* वळवाचा पहिला पाऊस झाल्यानंतर कडुनिंब, बाभूळ व बोर या झाडावरील भुंगेरे प्रकाश कंदील व रॉकेलचा वापर करून सामुदायिकरित्या रात्रीच्या वेळी गोळा करून नष्ट करावेत. हुमणीग्रस्त क्षेत्रात फिप्रोनिल (०.३ जीआर) ८ किलो प्रति एकर शेणखतात मिसळून द्यावे. नंतर हलके पाणी द्यावे.