जनावरांच्या खुरांची काळजी घ्या आणि एकूण उत्पादनात वाढ मिळवा

Veterinary

जनावरांच्या खुरांची काळजी घ्या आणि एकूण उत्पादनात वाढ मिळवा
खुरांचे आजार होण्याची संभाव्य करणे –
१. आहारातील प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिज क्षार यांचा असमतोल,
२. अपचन
३. बंदिस्त जागेतील जनावरांचे पालन
५. गोठ्यातील पृष्ठभाव ओबडधोबड असणे
४. व्यायामाचा अभाव

५. हवामानात आणि गोठ्यात वाढलेली आर्द्रता आणि दलदलीमुळे झालेला चिखल
६. जनावरांची कमी झालेली रोगप्रतिकार शक्ती
या आणि अश्या अनेक कारणांमुळे जनावरांना खुरांचे आजार होण्याशी शक्यता असते. च्या आजाराच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतात. या आजारामुळे जनावरांची प्रकृती खालावते. उत्पदनात मोठी घाट होते. अचानक आलेल्या लंगडेपणामुळे जनावरांची उपयुक्तता कमी होते. मुक्त संचार गोठा पद्धतीत खुरांचा नरमपणा जास्त आढळू शकतो जर ओले शेण-मूत्र, चिखल यात जनावर जास्त वेळ उभे राहिले तर खूर नरम पडतात. नरम खुर हे आजारास कारणीभूत ठरतात. खूर नरम पडल्याने खुरांमध्ये व्रण (अल्सर) तयार होतात. खुरांमध्ये गळू तयार होतात.
उपाय – जनावरांच्या उभे राहण्याची जागा कायम चिखलमुक्त तसेच कोरडी ठेवावी.
चामखिळाबरोबर पायाच्या त्वचेचा दाह – हा आजार चामखिळीमुळे नरम झालेली त्वचा आणि त्यावर झालेला जिवाणूंच्या संसर्गामुळे होतो.
उपाय – खूर तसेच संसर्ग झालेला भाग स्वच्छ धुऊन त्यावर प्रतिजैवकयुक्त मलम लावावे. कॉपर सल्फेटचे पाणी तयार करून त्यात जनावराचे पाय बुडवल्यास आजारास प्रतिबंध होतो. दररोज हे पाणी बदलावे.
खुरांंचा दाह – खुरांच्या आतील भागात असलेल्या ल्यामिना या नाजूक भागाचा दाह होतो. जास्त दुग्धोत्पादन असलेल्या गायी, म्हशींमध्ये हा आजार दिसतो. जनावराला अचानक उठायला तसेच बसायला त्रास होतो. जमिनीवर पाय टेकवत नाही. ताप येतो, श्वसनक्रिया वेगाने होते. हा आजार इतर आजारांसोबतही होतो. त्यामुळे लवकर लक्षात येत नाही.
उपाय – आजाराची लक्षणे दिसताच पशुवैद्यकांकडून उपचार करावेत. खुरांवर थंड बर्फ फिरवावा. कर्बोदकेयुक्त खाद्य कमी करावे.
पाय सडणे – खुराला पडलेल्या भेगांमध्ये जिवाणूंच्या संसर्गामुळे हा आजार होतो. खुरांच्यामधून सडल्यासारखा वास येतो. जनावर एका पायाने लंगडते. खुरांना तडा जाऊन त्यातून वास येणारा द्रव सुरवातीला बाहेर येतो. नंतर त्यातून पु येत रहातो. उपचार योग्यवेळी न झाल्यास संसर्ग सांध्यापर्यंत पोचतो.
उपाय – पाय स्वच्छ करून त्यावर प्रतिजैवकयुक्त मलम लावावे. पशुवैद्यकांच्या सल्याने उपचार करावेत.
लाळ्या खुरकूत – हा संसर्गजन्य आजार आहे. जनावरांच्या पायाला फोड येऊन ते फुटतात. झालेल्या जखमांमुळे खुरांचे आवरण आणि आतील भागातील अंतर वाढते. आजारामुळे गाई, म्हशीला प्रचंड त्रास होऊन दूध उत्पादन घटते. बैल शेतीसाठी निरोपयोगी होतो.
उपाय – वर्षातून दोनदा पशुतज्ज्ञांच्या सल्याने लसीकरण करावे. शक्यतो पावसाळ्यापूर्वी लसीकरण करावे.
खुरांची काळजी –
१. जनावरांची खुरे वर्षातून किमान एकदा योग्य प्रकारे तपासावीत.
२. पावसाळ्यापूर्वी तसेच त्यानंतर सहा महिन्यांनी लाळ्या खुरकूत रोगप्रतिकारासाठी लसीकरण करून घ्यावे.
३. मुक्त गोठा पद्धतीमध्ये चिखल होणार नाही याची दक्षता घ्यावी.
४. जनावरांना जीवनसत्वयुक्त व पौष्टिक खाद्य द्यावे.
५. जनावरांना स्वच्छ व कोरड्या जागी बांधावे.
६. गोठ्याची फरशी गुळगुळीत नसावी. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने आजारी जनावरांवर उपचार करावेत.
७. नियमित खुरांची काळजी घेतली तर, एकूण उत्पादनात नक्कीच वाढ भेटेल
डॉ. सोमनाथ भास्कर
के व्ही के दहीगाव ने.