Success Stories

Sugarcane Success story
कृषि विज्ञान केंद्र दहिगाव च्या ऊस रोपनिर्मीती प्रशिक्षणामुळे मिळाला ऊस रोपवाटिका व्यवसायाचा मंत्र
ऊस हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे नगदी पिक असून अहमदनगर जिल्ह्यात हे पिक मोठया प्रमाणावर घेतले जाते. जिल्ह्यात ऊस पिक हे विविध परिस्थितीत घेतले जाते. ऊस लागवडीसाठी शेतकरी एक किंवा दोन डोळ्याच्या ऊस टिपरीं वापरतात. ऊस टिपरींच्या वापर केल्यामुळे उसाची उगवण होण्यास कमीतकमी २१ दिवस लागतात.

त्याठिकाणी जर ऊस रोपांचा वापर केल्यास २१ दिवसाची रोपे शेतात लागवडीस तयार होतात.या ऊस रोपापासून ऊस लागवडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हि बाब कृषि विज्ञान केंद्राने लक्ष्यात घेऊन उसाची रोपे तयार करण्याची रोपवाटिका तयार करता येऊ शकते हि संकल्पना पुढे आली. त्यानुसार केंद्रातर्फे फेब्रुवारी-२०१४ मध्ये ग्रामीण भागातील तरुणांसाठी कौशल्य वृद्धी प्रशिक्षणातर्गत ऊस रोपवाटिका व्यवस्थापन या विषयायावर प्रशिक्षण आयोजित केले.
राजू पाटीलबा कदम तसे देडगाव तालुका – नेवासा, जिल्हा – अहमदनगर येथील सर्वसाधरण शेतकरी. पण आज राजु कदम यांची ओळख प्रगतशील शेतकरी व ‘मातोश्री ऊस रोपवाटिका’ यातून यशस्वी उदजोजक अशी होत आहे. या ग्रामिण युवकाचा प्रवास विध्यार्थी दशेपासूनच संघर्षातून यश व विजय असा राहिला आहे. राजू कदम यांना खेळाची आवड. शाळेय जीवनापासून अनेक खेळात यशस्वी खेळाडू म्हणून पुढे येत गेले. यातूनच राजू यांचे घडलेले व्यक्तिमत्व व हुशारी यावर त्यांनी १२ वी शिक्षणाच्या आधारे वयाच्या १८ व्या वर्षी भारतीय नौदलत नोकरी मिळवली. नौदलाच्या माध्यमातून ३ वर्षे देशसेवा केल्यानंतर कौटुंबिक, शेती व गावचे आकर्षण तसेच काहीतरी वेगळे करण्याची मानसिकता यामुळे त्यांनी नोकरीला राजीनामा दिला. खेळाडू व नौदालीची नोकरी यातून त्यांना लागलेली शिस्त, जिद्द, आत्मविश्वास,व ध्येय ठेऊन काम करण्याची सवय राजू यांना गावी स्वस्थ बसु देत नव्हती. यातुनच कृषि विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली उभी राहिली ‘‘मातोश्री ऊस रोपवाटिका’’.
कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव (ता. शेवगाव) यांचे योगदान – देडगाव नेवासा-शेवगाव राज्य मार्गावर कुकाणा या गावापासून दक्षिणेला ०९ कि.मी. अंतरावरचे गाव. गावची लोकसंख्या ४६००., ऊस हे गावचे व तालुक्याचे प्रमुख पैसा देणारे पिक. अहमदनगर जिल्हयाची ऊस उत्पादक व सहकार अशी जुनी ओळख. जिल्हयात पाऊसमान कमी असले तरी मुळा व जायकवाडी धरण व कॅनाल यामुळे बागायती क्षेत्र जास्त. पंचक्रोशीतले १० गावे मिळून ८ ते ९ हजार एकर क्षेत्रावर ऊस पिकाची लागवड केली जाते. हि सर्व गावे ‘ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना ली. ज्ञानेश्वरनगर (भेंडा) कार्यक्षेत्रात येतात. ऊस विकासाच्या बाबतीत कारखान्याने अनेक उपक्रम राबविले आहेत. परिसरातील व भागधारकांच्या मुलांसाठी कारखान्याचे संस्थापक लोकनेते मारुतराव घुले पा. यांनी शिक्षण संस्था सुरु केलेली असून संस्थेतर्गत अहमदनगर जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाकडून कृषि विज्ञान केंद्रास मंजुर मिळाली आहे. याचा उपयोग भागातील शेतकरी वर्गाकरिता शेती व शेती आधारीत व्यवसाय करिता मोठे विधायक कामाकरिता होत आहे . याच कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव (ता. शेवगाव) च्या वतीने फेब्रुवारी २०१४ मध्ये खास ग्रामिण युवकांसाठी ऊस रोपवाटिका व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यात राजू कदम यांनी सहभाग घेतला. तेथेच त्यांचा मनात ठिणगी पडली. आणि त्यांनी तेथेच ऊस रोपवाटिका चालू करण्याचे ठरवले .
प्रती महिना रु. ४० हजार नफा – २ मार्च २०१४ मध्ये राजू कदम यांनी रोपवाटिका उभारणीस सुरवात केली. त्यांना सर्व तांत्रिक मार्गदर्शन ‘कृषी विज्ञान केंद्र’, दहिगाव यांचेकडून मिळाले. त्यांनी विविध यशस्वी व अयशस्वी अशा सर्व प्रकारच्या अनुभवी रोपवाटिकाधारकांशी चर्चा करून माहिती मिळवली. यामध्ये त्यांना खूप आव्हान वाटले. ते आव्हान स्वीकारत त्यातील बारकावे समजावून घेऊन त्यांनी चालू केलेली ‘‘मातोश्री ऊस रोपवाटिका’’ १० महिन्यामध्ये ४ लाख रोपांची विक्री करून, रुपये ४ लाख नफा म्हणजे प्रती महिना रुपये ४० हजार निव्वळ नफा मिळवून यश संपादन केले. नोकरीच्याच मागे धावणारे व बेरोजगार युवकांसाठी एक प्रकारचा आदर्श निर्माण केला आहे.
रोपवाटिका अर्थशास्त्र – श्री राजू कदम यांनी रोपवाटिका करिता ४००० चौ. फुट. (८०x ५० फुट) आकाराचे शेडनेट घरचे घरी कमी खर्चात उभारले.(घरचे भंगार व सिमेंट पाईप, स्वस्त जाळी, स्वतः शिलाई इ. त्यासाठी त्यांना रु. ४६००० इतका खर्च आला. एकूण स्थिर खर्च खालील प्रमाणे.

स्थिर खर्च –
अ.क्र. खर्च बाब रक्कम रु.
१.  शेडनेट उभारणी ४६०००
२. लहान स्प्रिकलर / पाणी व्यवस्था ४०००
३. बड कटिंग मशीन/ स्वयंचलित डोळे काढणे मशिन ६००००
४. क्रेट (रु.३००*१५०) ४५०००
एकून स्थिर खर्च १,५००००/-(रु. दीड लाख )

वरील पैकी बड कटिंग मशीन/ डोळे काढणे मशिन कदम यांनी मजूर टंचाई, वेगात काम व कामात गुणवत्ता याकरिता उशिरा घेतले. यामुळे प्रती तास ४ ते ६ हजार डोळे काढणे शक्य होते. यामुळे खर्चात देखील बचत होते.

खेळते भांडवल व उत्पादन खर्च – श्री. कदम यांनी सुरवातीस ४२ कपांचे प्लास्टिक ट्र मध्ये रोपे तयार करत तर आता ते ७० कपांचे ट्र रोपे तयार करण्याकरिता वापरतात, यामुळे प्रती रोप तयार करण्याचा उत्पादन खर्च २० ते २५ पैशानी कमी होतो.
प्रती बच (मागणी नुसार) अंदाजे ५०००० (पन्नास हजार) रोपे तयार करण्याकरिता खर्च खालीलप्रमाणे –

खेळते भांडवल / चालू उत्पादन खर्च प्रती ५० हजार रोपे –
 प्रती ट्र ४२ कपे/ रोपे करिता प्रती ट्र ७० कपे/ रोपे करिता
अ.क्र. खर्च बाब रक्कम रु. खर्च बाब रक्कम रु.
१. प्लास्टिक  ट्र  – ११९० x  दर रु १२ १४२८० प्लास्टिक ट्र – ७१५ * दर रु ९ रु.६४३५
२. कोकोपीट – १५० बाग  x  रु १५० रु.२२५००/- कोकोपीट – ५१ बँग  x  रु १५० रु.७६५०
३. बेणे विकतचे – ५ गुंठे क्षेत्र रु. २००००/- बेणेविकतचे – ५ गुंठे क्षेत्र रु.२००००
४. मजुरी – बेणे तोडणे, वाहतूक, बीज प्रक्रिया, ट्र भरणे, रोपे पुनर्भरण  इ. सर्व कामे रु.१५०००/- मजुरी – बेणे तोडणे, वाहतूक, बीज प्रक्रिया, ट्र भरणे, रोपे पुनर्भरण  इ. सर्व कामे रु.१५०००/-
५. बीज प्रक्रिया, आळवणी व फवारणी औषधे, खते. रु.१२००/- बीज प्रक्रिया, आळवणी व फवारणी औषधे, खते. रु.१२००/-
६. विज बिल,रोपांची मर, प्रतवारी व रोपे पोहोच कामी रु.६०००/- विज बिल,रोपांची मर, प्रतवारी व रोपे पोहोच कामी रु.८०००/-
७. ईतर किरकोळ खर्च रु.३०००/- ईतर किरकोळ खर्च रु.४०००/-
८. स्थिर खर्चा पोटी रु.४००० /- स्थिर खर्चा पोटी रु.४००० /-
* एकूण उत्पादन खर्च रु.८५९८० /- एकूण उत्पादन खर्च रु.६६२८५/-
* प्रती रोप उत्पादन खर्च रु. रु.१.७२ /- प्रती रोप उत्पादन खर्च रु. रु.१.३२/-
* प्रती रोप सरासरी विक्री रु. रु.२.७५ /- प्रती रोप सरासरी विक्री रु. रु.२.५०/-

अशा प्रकारे शास्त्रीय उत्पादन तंत्राचा वापर करून प्रती रोप किमान १ रुपया निव्वळ नफा शिल्लक राहतो. रोपे विक्री योग्य होण्यास हंगामानुसार २० ते ३० दिवस कालावधी लागतो.

ऊस रोपे विक्री तंत्र – राजु कदम यांच्या मते ऊस रोपवाटिका यशश्वितेमध्ये सर्वात आव्हानात्मक काय असेल तर ते विक्री व्यवस्थापन आणि त्यानुसार पुरवठा. कदम यांना विक्री करिता विशेष मदत झाली ती ज्ञानेश्वर सह. साखर कारखाना व कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव, ता. शेवगाव यांची . याकरिता सातत्यपुर्वक संपर्क आवश्यक आहे, त्याकरिता त्यांनी व्हाटस अप, फेसबुक या आधुनिक माहिती तंत्रज्ञान साधनांचा वापर अत्यंत खुबीने केला आहे. तसेच व्हिजीटीग कार्ड वापर,वृत्तपत्रातुन जाहिराती व माहितीपत्रके वाटप या साधनांचा देखील वापर त्यांनी केला आहे. यामुळे त्यांना स्थानिक ग्राहकांसोबत ईतर जिल्ह्यातील ग्राहक देखील मागणी नोंदवत आहेत. सुरवातीच्या काळात शेतक-यामध्ये रोपे लागवडीबद्दलचे गैरसमज दुर करावे लागले. त्यासाठी त्यांना स्वःचे शेतावर ऊस रोपांपासून लागवडीचा प्लॉट यशस्वीपने उभा करावा लागला, त्यांनी बहुतांश शेतक-याना विक्री पश्चात सेवा दिली त्याचाही त्यांना चांगला फायदा झाला. तयार झालेले रोपाना वेळेत ग्राहक न मिळाल्यास मात्र मोठे नुकसान होण्याची वेळेत शेतकयांनी

यशामागील श्रेय – श्री. ज्ञानेश्वर स. सा. का. लि., ज्ञानेश्वरनगर अधिकारी व कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव-ने चे कार्यक्रम समन्वयक श्री. नारायण निबे, सचिन बडधे, प्रकाश बहिरट यामुळे हे सर्व शक्य झाल्याचे राजु कदम आवर्जून सांगतात. पत्नी सौ. ज्योती यांनी कुटुंबामध्ये साथ दिल्याने व प्रत्यक्ष रोजाच्या कामात सहभागामुळे खुप मोठी मदत झाली.
शेतक-याचे नाव – श्री. राजु पटीलबा कदम, मो. न – ९७६३०२१४८१
मु. पो. देडगाव (बालाजी)
ता. नेवासा, जि. अहमदनगर
लेखक – श्री. नारायण निबे, प्र. कार्यक्रम समन्वयक
श्री. सचिन बडधे, विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार)
कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ता. शेवगाव, जि. अहमदनगर

(more)