पशु विज्ञान

पशु विज्ञान – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

परसातील कुक्कुटपालनासाठी कोणत्या जाती वापराव्यात??
-जात — संस्थेचे नाव — उत्पादकता
गिरिराज — पशुवैद्यकीय महाविद्यालय, बंगलोर — अंडी व मांस
गिरिराणी — पशुवैद्यकीय महाविद्यालय, बंगलोर — अंडी
वनराज — प्रकल्प अधिकारी, कुक्कुटपालन, हैदराबाद — अंडी व मांस
ग्रामप्रिया — प्रकल्प अधिकारी, कुक्कुटपालन, हैदराबाद — अंडी
कृषी-ब्रो — प्रकल्प अधिकारी, कुक्कुटपालन, हैदराबाद — अंडी व मांस
कृषी-जे — पशुवैद्यकीय महाविद्यालय, जबलपूर — अंडी
ग्रामलक्ष्मी — केरळ कृषी विद्यापीठ, पशुवैद्यकीय महाविद्यालय, केरळ — अंडी
हितकॅरी — राष्ट्रीय पशुसंधान केंद्र, इज्जतनगर — अंडी व मांस
अपकरी — राष्ट्रीय पशुसंधान केंद्र, इज्जतनगर — अंडी
कॅरी निर्भिक — राष्ट्रीय पशुसंधान केंद्र, इज्जतनगर — अंडी
कॅरी श्‍यामा — राष्ट्रीय पशुसंधान केंद्र, इज्जतनगर — अंडी

ब्रॉयलर पक्षांना शेडमध्ये किती जागा लागते?
– ब्रॉयलर पक्षांना शेडमध्ये प्रती पक्षी १ स्क़े.फुट जागा लागते.
देशी पक्षांना साधारण किती जागा लागते?
-०.८ ते ०.९ स्क़े.फुट जागा लागते.

गिरीराज पक्षी साधारण किती अंडी देतात?
– १३० अंडी वयाच्या ७२ आठवड्यापर्यंत देतात.

ग्रामप्रिया पक्षी साधारण किती अंडी देतात?
२००-२३० अंडी वयाच्या ७२ आठवड्यापर्यंत देतात.

परसबागेतील कोंबड्यांचा खुराडा कसा असावा?
खुराडयात हवा खेळती राहावी, उन, वारा, पाउस, मांजर, कुत्रे यांचापासून बचाव व्हावा, खुराडा जास्तीत जास्त ५० पक्षांसाठी एक याप्रमाणे बांधावा, प्रत्येक पक्षाला साधारण एक स्क़े फुट जागा असावी.उंच ठिकाणी व उन्हाने तापणार नाही अशा ठिकाणी असावा.

लसीकरण कोणत्या वेळी करावे?
लसीकरण थंड वेळी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावे.

मांसल पक्षांसाठी शेड कसे असावे?
शेड पूर्व-पश्चिम लांब असावे, पूर्व-पश्चिमेच्या भिंती पूर्ण बांधाव्यात , दक्षिण उत्तर दिशेला एक फुट उंच भिंत बांधून त्याच्यावर जाळी लावावी, शेड जमिनीपेक्षा किमान एक फुट उंच असावी, शेडची उंची मध्यभागी १२ फुट, तर दक्षिण उत्तर दिशेला ७-८ फुट असावी, शेडची रुंदी २३-२८ फुट असावी.

मानमोडी रोगाबद्दल माहिती द्या?
कमी वयाच्या पक्षांमध्ये अचानक ८०-१०० % मरतुक होते, वयस्कर पक्षांमध्ये श्वासोच्छवास घेण्यास त्रास होतो, तोंडाला सूज येते अशक्तपणा येतो, हिरवी व पातळ पाण्यासारखी संडास होते, मानेचा , पंखाचा व पायाचा पॅरालीसीस होतो , अंडी देणा-या पक्षांमध्ये अंडी उत्पादन घटते व पातळ कवचाची अंडी देतात.

मानमोडी रोगावर औषधोपचार सांगा?
रोग झाल्यानंतर हमखास औषधोपचार नाही, परंतु लक्षणे दिसताच लासोटा लसीकरण करावे, पक्षांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अ, ड, क व ब जीवनसत्वे द्यावीत.