*कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने मार्फत ‘जागतिक मृदा दिन’ साजरा*
- admin
- 0
- Posted on
*कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने मार्फत ‘जागतिक मृदा दिन’ साजरा*
माती हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमीच दुर्लक्षित राहिलेला स्त्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करणेसाठी ५ डिसेंबर हा ‘जागतिक मृदा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी संयुक्त राष्ट संघाने जमिनीला सुरक्षित ठेवणे व संरक्षणासाठी जमिनीची क्षारता व खारवट पना घालाविण्यासती तसेच सुपीकता नियंत्रित ठेवणे हि संकल्पना ठेवलेली आहे. सन २०१५-१६ पासुन मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविले जात असून यामध्ये बागायत क्षेत्रातून २.५ हेक्टरला १ प्रातीनिधीक मृद नमुना व जिरायत क्षेत्रातुन १० हेक्टरला १ प्रातीनिधीक नमुना घेतला जातो व त्या परीघ क्षेत्रामध्ये सामाविष्ट सर्व शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिका देण्यात येते. अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच कांदा पिकामध्ये शेतकऱ्यांनी सिलिकॉन या अन्नद्रव्याचा वापर करून आपले कांदा पिकाचे उत्पादन त्याचबरोबर ऊस पिकात याचा वापर करून साखर उतारा व उत्पादन वाढीसाठी सिलिकॉन या अन्नद्रव्याचे महत्त्व शेतकर्यांसमोर विशद केले. या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या जागतिक मृदा दिनानिमित्त उपस्थित दर्शवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि विज्ञान केंद्राचे माती परीक्षण प्रयोगशाळेचे श्री प्रकाश बहिरट यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती गावचे प्रथम नागरिक सौ. वैशाली शिवाजी शिंदे यांनी भूषवले. यावेळी कृषि विक्री विस्तार निविष्ठा कोर्से श्री सुभाष कोरडे तसेच कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ सचिन बडधे, नारायण निबे, प्रकाश हिंगे, वंजारी दत्तात्रय, सागर ढिसले, कचरू पाबळे, पारे भाऊसाहेब यांचे सहकार्य मोलाचे ठरले