जागतिक कडधान्य दिवस साजरा.
- admin
- 0
- Posted on
के.व्ही.के. दहिगाव ने येथे जागतिक कडधान्य दिवस साजरा….
दहिगाव (वार्ताहर): मानवी आहारात आणि शेती मध्ये कडधान्य पिकांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे मत डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी व्यक्त केले. दिनांक १० फेब्रुवारी हा दिवस जागतिक कडधान्य दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्त कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आला. कार्यक्रमास मेजर संभाजी गोरे, सर्जेराव घाणमोडे, संतोष घुले, गणेश घुले, देविदास भेंडेकर तसेच भाऊसाहेब गोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी विषय विशेषज्ञ नारायण निबे यांनी जमिनीचा कस सुधारणेसाठी कडधान्य पिकांचे योगदान, विविध पिक पद्धतीत कडधान्य पिकांचा समावेश केल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत तसेच सद्य स्थितीत कडधान्य पिकाची घ्यावयाची काळजी या विषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रकाश बहिरट यांनी कडधान्य पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापानाविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. इंजि. राहुल पाटील यांनी कडधान्य शेती मध्ये औजाराचा वापर तसेच पाणी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी कृषि विज्ञान केंद्रामार्फत रिटायर्ड मेजर संभाजी गोरे तसेच इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ माणिक लाखे, नंदकिशोर दहातोंडे, सचिन बडधे, माजी सभापती बाळासाहेब धोंडे, जितेंद्र देशमुख, महेश जाधव, बद्रीनाथ मरकड, डॉ. चोपडे तसेच परिसरातील इतर प्रगतशील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण देशमुख, अनिल धनवटे, अंकुश क्षिरसागर, कचरू पाबळे व इतर कृषि विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन इंजि. राहुल पाटील तर आभार संतोष घुले यांनी केले.