*पाण्याचा कार्यक्षम वापर प्रत्येकाची जबाबदारी – मा.आ.डॉ.नरेंद्र घुले पाटील*
- admin
- 0
- Posted on
*केव्हीके दहीगाव-ने येथे जागतिक पाणी दिन साजरा*
श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने येथे दि.२२ मार्च २०२२ रोजी ‘जागतिक पाणी दिन’ कार्यक्रम संपन्न झाला. ‘२२ मार्च’ हा जगभरात ‘ पाणी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी जागतिक पाणी दिनाची थीम “भूजल-अदृश्य सदृश करणे” ही होती. पाण्याचा कार्यक्षम वापर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन मा.आ.श्री.नरेंद्र घुले पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले ते कार्यक्रमाचच्या अध्यक्षपदावरून बोलत होते. कमीत कमी पाण्यात अधिक उत्पादन घेणे हे कौशल्य नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी अवगत करावे असे आवाहन डॉ. घुले यांनी शेतकऱ्यांना याप्रसंगी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.श्यामसुंदर कौशिक यांनी शेतीसाठी पाण्याच्या कार्यक्षम वापर तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले. ऊस पिक उत्पादकता व उत्पादन वाढीसाठी एकात्मिक तंत्रज्ञान व्यवस्थापन गरजेचे आहे असे प्रतिपादन लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर स.सा. कारखान्याचे संचालक श्री.काकासाहेब शिंदे यांनी केले. सद्य परिस्थितीत ऊस खोडवा व्यवस्थापन या विषयावर केव्हीके चे शास्त्रज्ञ श्री.सचिन बडधे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ऊस पिकातील यांत्रिकीकरण या विषयावर महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील प्राध्यापक व प्रमुख संशोधक, अखिल भारतीय समन्वयीत कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे डॉ. तुळशीदास बास्तेवाड यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच केव्हीके चे शास्त्रज्ञ इंजि.राहुल पाटील यांनी जागतिक पाणी दिनानिमित्त भूजलाचे महत्व, भूजल स्तर उंचावण्यासाठी भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान याविषयी उपस्थितांना माहिती दिली. ऊस पिकातील विविध यंत्राचे प्रात्यक्षिक शक्तिमान औजारे कंपनीचे श्री.दादासाहेब गर्जे, प्रदीप कांगुणे यांनी केव्हीके च्या प्रक्षेत्रावर सादर केले.
या कार्यक्रमासाठी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.अनिल मडके, शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब धोंडे, दहिगाव-ने चे सरपंच सुभाष पवार, रांजणी चे सरपंच काकासाहेब घुले, कृषि विभाग नेवासा चे कृषि सहाय्यक श्रीमती. रोहिणी मोरे, श्री. जी. एल. बामनपल्ले, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक विष्णूपंत जगदाळे, भाऊसाहेब कांगुणे, कारखान्याचे शेतकी अधिकारी सतीश डावखर, जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहीगाव-ने चे प्रशासकीय अधिकारी कारभारी नजन सर, प्रगतशील शेतकरी मिलिंद कुलकर्णी, बाळासाहेब मरकड, आप्पासाहेब फटांगडे, आसाराम लोढे, रतन मगर, अंकुश भोरजे, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ, नंदकिशोर दहातोंडे, प्रकाश बहिरट, प्रकाश हिंगे, प्रविण देशमुख, संजय थोटे, गणेश घुले, वंजारी दत्तात्रय व ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे शेतकी विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण निबे तर आभार माणिक लाखे यांनी मानले