*कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद स्थापना दिन साजरा*
- admin
- 0
- Posted on
*कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद स्थापना दिन साजरा*
दहिगाव-ने ता.शेवगाव-श्री.मारुतराव घुले घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा ९४ वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिल्ली येथून ऑनलाईन पद्धतीने देशभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
दिनांक १६ जुलै हा दिवस भारतातील कृषि क्षेत्रातील सर्वोच्य संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा स्थापना दिवस म्हणून संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्रजी घुले पाटील व केव्हीके चे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.श्यामसुंदर कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विज्ञान केंद्राच्या मार्फत दहिगाव-ने व माळीचिंचोर ता.नेवासा या दोन ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (कृषि विस्तार) डॉ.ए.के. सिंग, महासंचालक व सचिव (डेअर) डॉ.त्रिलोचन महापात्रा, केंद्रीय कृषि राज्यमंत्री श्री.कौलाशजी चौधरी, केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्ध व मस्त्यव्यवसाय मंत्री श्री.परषोत्तम रुपाला व केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिल्ली येथून शेतकऱ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी देशभरातील कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबविले जाणारे विविध उपक्रमासंदर्भात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. यानिमित्ताने माळीचिंचोरा येथे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्था, मांजरी, पुणे व कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती विशेष घटक योजनेतंर्गत सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर डॉ.श्यामसुंदर कौशिक व श्री.नारायण निबे यांनी उपस्थिती शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथील उपस्थित शेतकऱ्यांना श्री.माणिक लाखे, श्री.नंदकिशोर दहातोंडे, श्री.राहुल पाटील, श्री,बहिरट प्रकाश यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.प्रविण देशमुख, श्री.दत्तात्रय वंजारी, संजय थोटे यांनी मदत केली. सदर कार्यक्रमास १५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन श्री.सचिन बडधे व आभार श्री.प्रकाश हिंगे यांनी मानले.
Read more