गहू पिकासाठी सुधार्रीत वाण : फुले समाधान (एन.आय.ए.डब्ल्यू. १९९४)
- admin
- 0
- Posted on
गहू पिकासाठी सुधार्रीत वाण : फुले समाधान (एन.आय.ए.डब्ल्यू. १९९४)
महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात वेळेवर ( १ ते १५ नोव्हेंबर ) तसेच उशिरा (१५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर ) पेरणीसाठी सरबती गव्हाचा फुले समाधान (एन.आय.ए.डब्ल्यू. १९९४) हा वाण प्रसारित करण्यात आला आहे.
- महाराष्ट्रातील बागायत क्षेत्रात वेळेवर किंवा उशिरा अशा दोन्ही कालावधीत पेरणीसाठी एन.आय.ए.डब्ल्यू. १९९४ सरबती गव्हाचा हा एकमेव वाण आहे. वेळेवर पेरानिखाली उत्पन्न ४६.१२ क्वि/ हेक्टर तर उशिरा पेरणीखाली उत्पन्न ४४.२३ क्वि/ हेक्टर.
- तपोवन. एम.ए.सी.एस. ६२२२ , एन.आय.ए.डब्ल्यू. -३४ व एच डी २९३२ या तुल्य व प्रचलित वाणांपेक्षा सरस.
- तांबेरा रोगास तसेच मावा किडीस देखील प्रतिकारक्षम.
- टपोरे व आकर्षक दाणे, १००० दाण्यांचे वजन ४३ ग्रॅम, प्रथिनांचे प्रमाण १२.५० ते १३.८० % , चपातीची प्रत उत्कृष्ट व प्रचलित वाणांपेक्षा सरस.
- प्रचलित वाणांपेक्षा ९ ते १० दिवस लवकर येतो.
गहू उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान :
- गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे तृणधान्य पिक आहे.
- गहू जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो.
- भारताच्या सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत (२९८९ किलो/हेक्टर) महाराष्ट्राची उत्पादकता फारच कमी आहे.
- अहमदनगर जिल्ह्यात गहू हे पिक २४७०० हेक्टर क्षेत्रावर घेतले जात असून त्यापासून २२२०० मे. टन उत्पादन व ८.९७ क्विं/हेक्टर एवढी आहे.
- जिरायत गव्हासाठी जास्त पाऊस पडणाऱ्या व जमिनीत ओलावा टिकऊन धरणाऱ्या भारी जमिनीची निवड करावी.
- बागायती गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी व खोल जमीन निवडावी.
- मध्यम जमिनीत भरखते व रासायनिक खतांचा योग्य वापर केल्यास गव्हाचे चांगले उत्पादन घेता येईल. शक्यतो हलक्या जमिनीत गहू पिक घेण्याचे टाळावे.
- गहू पिकाच्या मूळ्या जमिनीत ६० ते ७५ सें.मी. खोलवर जातात त्यासाठी जमिनीची १५ ते २० सें.मी. खोलवर नांगरट करावी.
- त्यानंतर कुळवाच्या ३-४ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पूर्वीच्या पिकांची धसकटे , काडी कचरा वेचून शेत स्वच्छ ठेवावे. शेवटच्या कुळवणी अगोदर २० ते २५ बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत/कम्पोस्ट टाकावे.
- जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात करावी. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात बागायती गव्हाची पेरणी करावी.
- बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबर नंतर उशिराकेल्यास प्रत्येक पंधरवड्यास हेक्टरी २.५ क्वि उत्पादन कमी येते व त्यामुळे १५ डिसेंबर नंतर पेरलेले गव्हाचे पिक फायदेशीर ठरत नाही.
- बियाणे जिरायत गहू: ७५ ते १०० किलो/हेक्टर, बागायती वेळेवर पेरणी: १०० ते १२५ किलो/हेक्टर, उशिरा पेरणी : १२५ ते १५० किलो/हेक्टर.
- पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची ३ ग्रॅ. प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
- प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅ. अॅझोटोबॅक्टर व २५० ग्रॅ. पी.एस.बी. या जिवाणू संवर्धन खताची बीजप्रक्रिया करावी. यामुळे उत्पादनात १० ते ५० टक्के वाढ होते.
- बागायत गव्हाची वेळेवर पेरणी दोन ओळीत २० सें.मी. व उशिरा पेरणी १८ सें.मी. अंतर ठेऊन करावी. बी ५ ते ६ से. मी. खोल जाईल याची काळजी घ्यावी. जिरायत गव्हाची पेरणी दोन ओळीत २० सें.मी. अंतर ठेऊन करावी.
- बागायती गव्हाच्या पिकासाठी २० ते २५ चांगल्या कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. बागायती गव्हास हेक्टरी १२० किलो नत्र,६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे.
- पेरणीनंतर साधारणपणे १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मध्यम ते भारी जमिनीत गहू पिक तयार होण्यासाठी ४ ते ५ वेळा पाणी द्यावे.
- गहू पिकातील अरुंद व रुंद पानांच्या तणनियत्रणासाठी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी दर हेक्टरी मेट सल्फुरॉन मेथाईल २० टक्के हेक्टरी २० ग्रॅम किंवा २,४ डी (सोडियम) १२ ते १५ अधिक २ टक्के युरिया ६०० ते १२५० ग्रॅम ६०० ते ८०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- गव्हावर करपा या रोगाचा देखील प्रादुर्भाव दिसून येतो. करपा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रोगाची लक्षणे दिसू लागताच कॅापर (०.२ टक्के) अधिक मन्कॉझेब ०.०२ टक्के या बुरशी नाशकाच्या फवारण्य १५ दिवसाच्या अंतराने कराव्यात.
- मावा व तुडतुडे या किडींच्या नियंत्रणासाठी डायमेथोइट ३० ई.सी. ५०० मि.ली. किंवा थायोमिथाक्झम २५ डब्लू जी. ५० ग्रॅम प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
कृषिविद्या विभाग,
श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे,
कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने ,
ता. शेवगाव जि. अहमदनगर
संपर्क : (०२४२९)-२७२०२०