सद्य स्थितीत पीक सल्ला 14-12-22
- admin
- 0
- Posted on
सद्य परिस्थितीत रात्री चे तापमान 11 ते 17 अंश से. व दिवसाचे तापमान 22 ते 28 अंश से. ही तापमानातील तफावत , हवेतील आर्द्रता , आणि ढगाळ हवामानामु या मुळे शेतात उभी असलेली पिके उदा. तूर, मका, हरभरा , गहू, ज्वारी, त्याच प्रमाणे इतर फळ व भाजीपाला पिके यावर देखील किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी खालील प्रमाणे उपाय योजना करावी
तूर, :उशिरा लागवड झालेले तूर पिकावर घाटेअळी व मावा किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यासाठी एच ए एन पी व्ही 200 मिली 200 लिटर पाण्यातून प्रती एकरी फवारणी करावी .मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी डामेथोएट 2 मिली प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी
मका : मका पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो तेव्हा त्याचे नियंत्रणासाठी निंबोळी अर्क 5% किंवा दस्परणी अर्क 300 मिली प्रती पंप या प्रमाणे फवारणी घ्यावी
मका पिकावरील लष्करी अळी चे नियंत्रणासाठी मेटारायझियम 25 ग्राम किंवा नमोरिया 25 ग्राम प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी
गहू :मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी थायोमेथोक्झाम 1 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
हरभरा :सध्याच्या काळात घाटे अळी (हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा) प्रादुर्भाव वाढणार आहे. अळी लहान अवस्थेत असेल, तर नियंत्रणासाठी निंबोळी एक 5% किंवा कलोरोपायरीफॉस 2 मिली प्रती लिटर पाणी मिसळून फवारावे.
ज्वारी : ढगाळ वातावरणामुळे ज्वारीवर मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. मावा कीड पाने खरवडते. त्यातून साखरयुक्त द्रव बाहेर येतो. या चिकट द्रवावर बुरशी वाढते. त्यामुळे धान्य आणि कडब्याची प्रत खालावते. या किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट (30 टक्के प्रवाही) 10 मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रीड (17.8 टक्के प्रवाही) तीन मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
डाळिंब :सध्या अनेक ठिकाणी ढगाळ व पावसाळी वातावरण आहे. अशा वातावरणात डाळिंब बागेमध्ये तेलकट डाग रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी. बुरशीनाशक बाग विश्रांती अवस्थेत असताना – बॅकट्रीनाशक (2 ब्रोमो 2 नायट्रो 1-3 डायोल) 25 ग्रॅम ,+250 ग्रॅम कॅप्टन प्रति 100 लिटर . किंवा बोर्डो मिश्रण अर्धा ते एक टक्के या प्रमाणे फवारणी करावी
मृग बहराच्या फळांवर बुरशीची वाढ वाढून बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढेल.याचे नियंत्रण करण्यासाठी कार्बेन्डाझिम 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून तत्काळ फवारणी करावी
सीताफळ पिकावर ऍन्थ्रॅकनोज या बुरशीजन्य रोगाची तीव्रता वाढेल. याच्या प्रादुर्भावामुळे कोवळे शेंडे काळे झालेले दिसतील. रोगाच्या नियंत्रणासाठी एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
लाखे माणिक
विषय विशेषज्ञ (पीक संक्षणास)
कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने