ऊस पिकात लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव अढळून येत असल्यास
- admin
- 0
- Posted on
ऊस पिकात लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव अढळून येत असल्यास
1.ऊसात पाणी साचत असल्यास चर काढून पाण्याचा निचरा करावा आणि पाण्याचा जास्त ताण पडल्यास पाणी द्यावे.*
2. नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करू नये.*
3. पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.*
4. पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.*
5. व्हर्टिसिलियम लिकॅनी आणि बिव्हेरिया बेसियाना या जैविक बुरशीची ६० ग्रॅम/मी. ली. प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.*
6. रासायनिक कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरीफॉस २० टक्के ३० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के ३ मिली किंवा अॅसीफेट ७५% २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर दुसरी फवारणी करावी.
कीटकनाशकाची फवारणी आलटून-पालटून करावी
वरील प्रमाण साध्या पंपासाठी असून पावर पंपासाठी किटकनाशकाचे प्रमाण तीन पट करावे.