दहिगावने येथे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रम सांगता.
- admin
- 0
- Posted on
कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने येथे , आटारी पुणे व नॅशनल बी बोर्ड यांच्या सौजन्याने दिनांक 16 ते 22 नोव्हेंबर दरम्यान सात दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत कृषी विज्ञान केंद्राने अशा प्रकारचे तीन प्रशिक्षण पूर्ण केले असून त्याद्वारे जिल्ह्यातील व जिल्हया बाहेरील एकूण 75 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले आहे. तसेच ऑनलाईनच्या माध्यमातून सुमारे 60 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित केले आहे. या प्रशिक्षणाची सांगता आज दिनांक 22 नोव्हेंबर रोजी झाली प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण साहित्य व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
या सांगता कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे माननीय विश्वस्थ श्री काकासाहेब शिंदे यांनी भूषविले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी मधमाशाचे पराग सिंचनातील महत्त्व विशद केले आणि शास्त्रीय पद्धतीने मधमाशा पालनासाठी सर्व प्रशिक्षणार्थींना आव्हान केले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.श्याम सूंदर कौशिक यांनी आपल्या भाषणादरम्यान प्रशिक्षणार्थींना मधमाशी पालन करताना येणाऱ्या संभाव्य अडचणी विषयी मार्गदर्शन केले केले.
कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ श्री माणिक लाखे यांनी या कार्यक्रमाचे संपूर्ण को ऑर्डिनेशन केले. या कार्यक्रमा दरम्यान एकूण 35 प्रशिक्षणार्थीना प्रमाण पत्राचे वितरण करण्यात आले. या समापन सोहळ्यात मोठ्या संख्येने कृषी निविष्ठा विक्रेते उपस्थित राहिले. देशी कोर्स समन्वयक श्री सुभाष कोरडे हे देखील या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार इंजि राहुल पाटील यांनी केले.