*कृषि विज्ञान केंद्र दहिगाव येथे क्षारपड जमीन व्यवस्थापन या विषयी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न*
- admin
- 0
- Posted on
*कृषि विज्ञान केंद्र दहिगाव येथे क्षारपड जमीन व्यवस्थापन या विषयी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न*
“कृषी आणि अन्न प्रक्रिया: सहकार आत्मनिर्भर कृषीच्या नवीन युगात प्रवेश” या थीमवर नैसर्गिक शेती या कार्यक्रमाचे औचित्य साधून कृषि विज्ञान केंद्र दहिगाव येथे क्षारपड जमीन व्यवस्थापन या विषयी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशीक यांनी प्रास्ताविक करतांना क्षारपड जमीन होण्याचे कारणे व त्यावर उपाय योजना याविषयी सविस्तर असे सादरीकरण करून मार्गदर्शन केले.
तसेच भविष्यकाळात तंत्रज्ञानाचा उपयोग करून उन्हाळी हंगामातील सोयाबीन ऊस पिकात अंतर पिक म्हणून किंवा सरळ पिक म्हणून पेरावे. ज्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते व ऊस पिकाचे चांगले उत्पादन वाढते असे सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी सतीश डावकर होती.
कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील आनंद येथून कृषी आणि अन्न प्रक्रिया विषयक राष्ट्रीय शिखर परिषदेच्या सांगता सत्रादरम्यान शेतकऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे खरेदी केलेल्या निविष्ठांवरील अवलंबन कमी करण्यासाठी शून्य बजेट नैसर्गिक शेती हे एक शाश्वत साधन आहे आणि पारंपारिक क्षेत्र-आधारित तंत्रज्ञानावर अवलंबून राहून शेतीचा खर्च कमी करते ज्यामुळे मातीचे आरोग्य अबाधित राहते.
या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून ज्ञानेश्वर कारखान्यातील डॉ. भास्कर ताकटे यांनी पाण्याचा अति वापर व पाण्याची खराब होत चाललेली प्रत तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सेवानिवृत्त मृदा शास्त्रज्ञ डॉ. अशोक ढगे यांनी परिसरातील खराब झालेल्या जमिनी सुधारण्यासाठी पीक फेरपालट या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमध्ये वीरसेन पवार यांनी ऊस खोडवा पिकात पाचट व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये कृषि विक्री विस्तार निविष्ठा कोर्सेचे समन्वयक सुभाष कोरडे कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ माणिक लाखे, इंजि.राहुल पाटील, प्रकाश हिंगे, प्रविण देशमुख, वंजारी दत्तात्रय व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण निबे व आभार प्रकाश बहिरट यांनी केले.

Read more