कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने येथे ड्रोन द्वारे फवारणी प्रात्यक्षिक संपन्न
- admin
- 0
- Posted on
कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने येथे ड्रोन द्वारे फवारणी प्रात्यक्षिक संपन्न
दहीगाव-ने – श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने येथे ड्रोन द्वारे विविध पिकांवर फवारणी प्रात्यक्षिक संपन्न झाले. यावेळी कृषि विज्ञान केंद्र दहीगाव चे प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस एस कौशिक, केव्हीके चा सर्व स्टाफ, परिसरातील शेतकरी व कृषि निविष्टा वितरक उपस्थित होते.
Read more
गरुडा एरोस्पेस प्रा. ली. चेन्नई या ड्रोन निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या सहयोगातून प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लसून व पेरू या फळपिकावर फवारणी करण्यात आली. कृषि क्षेत्रात पिक संरक्षण तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक बाब आहे. पिक संरक्षणासाठी कृषि रसायनाचा वापर हि खर्चिक बाब आहे, योग्य वेळी फवारणी करणे कृषि रसायनाचा सुरक्षित व शिफारसीनुसार वापर करणे, फवारणीसाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध असणे या बाबींना महत्व आहे. शेतकऱ्यांना पिकावर फवारणी करण्यासाठी गरजेच्या वेळी कुशल मनुष्यबळाची उपलब्धता होत नाही. श्रम कमी करणे यासोबतच सुरक्षित फवारणी करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान उपयोगी आहे, असे प्रतिपादन यावेळी डॉ. कौशिक यांनी केले. गरुडा एरोस्पेस चे ड्रोन पायलट शेख साबीर व सहपायलट पी. थिलगराज यांनी उपस्थितांना प्रात्यक्षिक दाखवून ड्रोन बद्दलची माहिती दिली. सदर ड्रोन ची किंमत रु. ४ लाख इतकी असून एक एकर फवारणीसाठी २० मिनिट वेळ लागतो. यावेळी इंनसेक्तीसाईड इं. या पिक संरक्षण निविष्टा कंपनीचे चे श्री प्रतिक मोरे व श्री नितीन एकशिंगे, कृषि निविष्टा वितरक श्री अशोक शिंदे तसेच केव्हीके विषय विशेषज्ञ माणिक लाखे, सचिन बडधे, नंदकिशोर दहातोंडे, राहुल पाटील, प्रकाश बहिरट हे उपस्थित होते. केव्हीके चे प्रक्षेत्र व्यवस्थापक श्री प्रकाश हिंगे यांनी या प्रात्यक्षिकाचे नियोजन केले होते. शेतकामासाठी वेळेवर उपलब्ध ण होणारे मजूर, त्यातून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान तसेच उंच वाढणाऱ्या पिकांवर ड्रोन द्वारे फवारणी पद्धत नक्कीच किफायतशीर व लोकप्रिय ठरेल असे श्री हिंगे यांनी सांगितले. [/exapander_maker]