किसान भागीदारी प्राथमिकता हमारी
- admin
- 0
- Posted on
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने व किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमे अंतर्गत श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे भव्य शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय कृषि मंत्री मा.नरेंद्रसिंह तोमर यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.संपूर्ण भारतात या मोहिमेंतर्गत कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता.
केव्हीके दहिगाव-ने च्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्या प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलतांना मा.आ.पांडुरंग अभंग यांनी शेतीमधील विविध समस्या व वाढता उत्पादन खर्च यावर तज्ञांनी चिंतन व संशोधन करून मार्ग काढावे असे आवाहन करून नवीन आधुनिक तंत्रज्ञानांचा लाभ घेत शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढावे असे उपस्थितांना सांगितले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथील कीटक शास्त्र विभागाचे डॉ. संदिप लांडगे यांनी ऊस पिकातील हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन करतांना राबवण्याच्या विविध पद्धती बद्दल माहिती दिली. सेंद्रिय शेती तज्ञ व रोमीफ फौंडेशन, पुणे चे अध्यक्ष डॉ.प्रशांत नाईकवाडी यांनी विष मुक्त अन्न निर्मिती ही काळाची गरज असून हा संदेश प्रत्येक शेतकऱ्यान पर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी पिक उत्पादन वाढीचे विविध सूत्रे व केव्हीके दहिगाव-ने यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सेवा व सुविधा याबद्दल माहिती दिली. श्री.राजाराम गायकवाड, प्रकल्प उपसंचालक, ‘आत्मा’ अहमदनगर यांनी ‘आत्मा’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना विशेषतः प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया या योजने बद्दल माहिती दिली. श्री. काकासाहेब शिंदे व बाबासाहेब कंक यांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी केव्हीके दहिगाव-ने यांच्यावतीने कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध शेती औजारे, नैसर्गिक शेती पद्धती, केव्हीके कडील विविध निविष्टा जसे उस व फळ रोपे,बियाणे, जैविक खाते आणि जैविक कीडनाशके बद्दल शेतकऱ्यांनी पाहणी करून माहिती घेतली. यावेळी श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री.काशिनाथ नवले, दादासाहेब गंडाळ, जनार्दन कदम, शिवाजीराव कोलते, संस्थेचे सहसचिव रविंद्र मोटे, दहिगाव-ने चे सरपंच सुभाष पवार चेअरमन श्री.शाब्बीर शेख तर प्रगतशील शेतकरी दत्तात्रय खाटिक, लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर स.सा. कारखान्याचे शेतकी अधिकारी सतीश डावखर हे उपस्थित होते.यावेळी कृषि विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल अंकुश भोरजे, रतन मगर, गोरखनाथ साळुंके, सुदर्शन काळे, डॉ.शंकर जाधव, बाळासाहेब खरात, राधाकिसन घुले, विकास चावरे, संभाजी घुटे, सोमेश्वर लवांडे, हर्षद बेल्हेकर, कानिफनाथ सातपुते, गणेश चोथे, आप्पासाहेब फटांगडे, डॉ. शशिकांत शिंदे यांचा तसेच पत्रकार श्री रावसाहेब मरकड, श्री राजेंद्र पानकर, श्री. कारभारी गरड, श्री दादा मडके विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमात समाज विकास समिती व महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांचा सहभाग लाभला. मेळाव्यास शेतकऱ्यासोबत महिला शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.माणिक लाखे, नारायण निबे, नंदकिशोर दहातोंडे, प्रकाश हिंगे, अनिल देशमुख, प्रविण देशमुख, संजय थोटे, गणेश घुले, दत्तात्रय वंजारी यांचे योगदान लाभले. सूत्रसंचालन इंजि.राहुल पाटील यांनी केले व आभार सचिन बडधे मानले.