*केव्हीके मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान कार्यक्रम संपन्न*
- admin
- 0
- Posted on
*केव्हीके मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान कार्यक्रम संपन्न*
*कृषि निविष्ठा विक्रेतेसाठीचा ‘डेसी’ पदविका प्रदान समारंभ*
*दहिगाव-ने दि.(१७):* श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे प्रधानमंत्री किसान सन्मान संमेलन कार्यक्रम दि.१७ ऑक्टोबर रोजी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथून ऑनलाईन पद्धतीने किसान सन्मान निधीचा १२ हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला तसेच उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्र घुले पाटील उपस्थित होते. कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे कृषि निविष्ठा विक्रेत्यांकारिता चा ‘डेसी’ या पदविकेच्या बॅच २ च्या विद्यार्थांना पदविका प्रदान तसेच बॅच क्र.३ चा उद्धघाटन समारंभ पार पडला.
मॅनेज हैद्राबाद संचालित, आत्मा अहमदनगर यांच्या मार्फत कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या ‘डेसी’ पदविका कार्यक्रमामुळे कृषि सेवा केंद्र चालकाला कृषि संबंधी ज्ञानार्जनाचा तसेच कृषि निविष्ठा विक्रीचा परवाना मिळण्यासाठी उपयोग होत आहे. केव्हीके व्दारा राबविण्यात येणारा ‘डेसी’ पदविका कार्यक्रम हा नक्कीच परिसरातील कृषि निविष्ठा विक्रेत्यांसाठी स्तुस्त्य उपक्रम असल्याचे डॉ.नरेंद्र घुले यांनी नमूद केले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये ‘डेसी’ पदविका समन्वयक सुभाष कोरडे यांनी डेसी पदविका कार्यक्रमाची माहिती उपस्थितांना दिली. तसेच कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.श्यामसुंदर कौशिक यांनी ‘डेसी’ कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी केव्हीके चे सर्व शास्त्रज्ञ व संस्थेचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारचे नियोजन व संचालन करत असल्याचे नमूद केले.
उपविभागीय कृषि अधिकारी विलास नलगे यांनी ‘डेसी’ च्या विद्यार्थांनी पदविका माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांच्या भल्यासाठी करावा असे आवाहन केले. यावेळी अहमदनगर जिल्हा फर्टिलायझर असोसिएशनचे अध्यक्ष सतीश मुनोत यांनी, केव्हीके द्वारा ‘डेसी’ पदविकेच्या विद्यार्थांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते त्यामुळे जिल्हातील सर्व कृषि निविष्ठा विक्रेते समाधानी असल्याचे सांगितले. त्याबद्दल त्यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र घुले व केव्हीके दहिगाव-ने यांचे आभार मानले. यावेळी संस्थेचे विश्वस्त काकासाहेब शिंदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमास मंचावर संस्थेचे जेष्ठ विश्वस्त काकासाहेब नरवडे, संतोष पावसे, संस्थेचे सहसचिव रविंद्र मोटे, अहमदनगर जिल्हा फर्टिलायझर असोसिएशनच्या उपाध्यक्षा मनीषा खामकर, संजय कोळगे, राजेंद्र पाटील, जनता शिक्षण प्रसारक मंडळ चे प्रशासकीय अधिकारी कारभारी नजन, तसेच केव्हीके चे सर्व शास्त्रज्ञ व कर्मचारी हे उपस्थित होते. यावेळी डेसी पदविकेच्या बॅच २ च्या निविष्ठा वितरक विद्यार्थांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. या बॅच मध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थांना ट्रॉफी व विशेष प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात शेकडो शेतकरी व निविष्ठा वितरक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बडधे व आभार माणिक लाखे यांनी मानले.
ReplyForward |