*कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या शास्त्रीय सल्लगार समितीची बैठक संपन्न*
- admin
- 0
- Posted on
*दहिगाव-ने (प्रतिनिधी):-* श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या ८ वी शास्त्रीय सल्लगार समितीची बैठक दहिगाव-ने येथे दिनांक २५ नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्र घुले पाटील उपस्थित होते.
कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. शामसुंदर कौशिक यांनी सन २०२२ मध्ये केंद्रामार्फत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती या सभेत सादर केली. दहिगाव-ने कृषी विज्ञान केंद्राने पिक संरक्षण विषय विशेषज्ञ माणिक लाखे यांनी संपादित केलेल्या “शास्त्रीय मधुमक्षिका पालन” प्रशिक्षण पुस्तिकेचे प्रकाशन व कृषि विज्ञान केंद्र एका दृष्टिक्षेपात या माहिती पत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बैठीकीनंतर शास्त्रीय सल्लागार समितीच्या सदस्यांना प्रकाश हिंगे, नंदकिशोर दहातोंडे यांनी केव्हीके प्रक्षेत्रावरील चालू असलेल्या उपक्रमांना तसेच विविध प्रकल्पांना भेटी देऊन माहिती दिली.
सदर कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ नारायण निबे, इंजि.राहुल पाटील, प्रकाश बहिरट, वैभव नगरकर प्रविण देशमुख, अनिल देशमुख, दत्तात्रय वंजारी, संजय थोटे, गणेश घुले व संजय कुसळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन बडधे यांनी केले. प्रकाश हिंगे यांनी आभार मानले.