श्री सोमेश्वर श्रीधर लवांडे यांना राष्ट्रीय स्तरावर भारतीय कृषि संशोधन संस्थान फार्मर्स इनोव्हेशन अवॉर्ड् २०२३ जाहिर

श्री सोमेश्वर श्रीधर लवांडे यांना राष्ट्रीय स्तरावर भारतीय कृषि संशोधन संस्थान फार्मर्स इनोव्हेशन अवॉर्ड् २०२३ जाहिर*

*मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हस्ते फत्तेपूर तालुका नेवासा येथील प्रगतशील शेतकरी सोमेश्वर श्रीधर लवांडे यांचा सत्कार*

भारतीय कृषि अनुसंधान परिषद , नवी दिल्ली संलग्नित श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने मा. आ. डॉ.  नरेंद्रजी घुले पाटील , आ. चंद्रशेखर घुले पाटील साहेब, डॉ. क्षितिज घुले पाटील आणि सर्व विश्वस्त मंडळ, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. केंद्राचे प्रमुख डॉ. एस.एस. कौशिक आणि इतर शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर लवांडे यांच्याकडील नाविन्यपूर्ण चारा पिके, व बियाणे या संदर्भातील नाविन्यपूर्ण कार्याची दाखल घेऊन

भारतीय कृषि संशोधन संस्थान (IARI) नवी दिल्ली यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात येणाऱ्या *फार्मर्स इनोव्हेशन अवॉर्ड्स २०२३* साठी निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल

*मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हस्ते* *श्री.सोमनाथ लवांडे* यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे संचालक  मा. आ. पांडुरंग अभंग, देसाई आबा देशमुख काकासाहेब नरवडे, श्री काकासाहेब शिंदे, श्री अशोक दादा मिसाळ, श्री दादासाहेब गंडाळ, शिवाजी कोलते व सर्व संचालक मंडळ तसेच सचिव अनिल शेवाळे साहेब,सहसचिव श्री रवीन्द्र मोटे, केव्हीके चे शास्त्रज्ञ नारायण निबे, प्रविण देशमुख व महाराष्ट्र राज्य आर.एस.पी.& सी.डी. चे नाशिक  डिव्हिजनल कमांडर डॉ.सिकंदर शेख  उपस्थित होते.

Localnewss

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »