डॉ. श्याम सुंदर कौशिक यांना इमिनंट शास्त्रज्ञ पुरस्कार 2023 ने सन्मानित
- admin
- 0
- Posted on
*डॉ. श्याम सुंदर कौशिक यांना इमिनंट शास्त्रज्ञ पुरस्कार २०२३ ने सन्मानित*
श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने चे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कौशिक हे मागील ७ वर्षापासून केव्हीके दहिगाव-ने मध्ये प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. यांनी प्रबंधनाच्या संयोगाने तसेच कृषि विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयोगाने शाश्वत ऊस, भात, तूर, गहु उत्पादन तंत्रज्ञान, रुंद सरी वरंबा पद्धती, विविध जातींचा प्रचार प्रसार, संचार माहिती तंत्रज्ञानाच्या (ICT Application) साहाय्याने विविध पिकांसाठी मोबाईल अॅप जसे की ऊसतंत्रकेव्हीकेडी, कापूसतंत्र केव्हीकेडी, डाळिंबतंत्रकेव्हीकेडी, कांदातंत्र केव्हीकेडी त्याचप्रमाणे जैवसंतृप्त वाणांचा प्रचार व प्रसारमध्ये उल्लेखनीय कार्य केलेले आहे. त्या अनुषंगाने महात्मा गांधी चित्रकुट, ग्रामोदय विश्वविद्यालय चित्रकुट मध्ये आर.एस. कृषि शोध संस्थान प्रयागराज उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेमध्ये मा. कमल पटेल कृषि मंत्री मध्य प्रदेश शासन, डॉ. अरविंद कुमार शुक्ला, कुलगुरू राजमाता कृषि विद्यापीठ ग्वालियर व डॉ. भरत मिश्रा, कुलगुरू महात्मा गांधी चित्रकुट ग्रामोदय विश्व विद्यालय चित्रकुट यांच्या हस्ते इमिनंट शास्त्रज्ञ २०२३ पुरस्कार मिळालेला आहे.
डॉ. कौशिक यांनी नैसर्गिक शेतीची मुलभूत तत्त्वे आणि पद्धती या विषयावर या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये मार्गदर्शन केले. इमिनंट शास्त्रज्ञ २०२३ पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ. नरेंद्रजी घुले पाटील, विश्वस्थ श्री. चंद्रशेखर घुले पाटील, लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सह.सा.का.लि., भेंड्याचे व्हाईस चेअरमन मा.श्री. पांडुरंग अभंग व सर्व संचालक मंडळ तसेच संस्थेचे सचिव श्री. अनिल शेवाळे व सहसचिव श्री. रविंद्र मोटे यांनी अभिनंदन केले.