पावसाळ्यातील पशुधन व्यवस्थापन*`
- admin
- 0
- Posted on
*पावसाळ्यातील पशुधन व्यवस्थापन*“`१) सततच्या पावसामुळे रस्ते, चराऊ कुरणे, गोठे यांत चिखल/ दलदल झाली असल्याने जनावरांच्या खुरांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: संकरीत गायी व पांढरी खुरे असणारे सर्व जनावरांची खुरे भिजून मऊ होतात. त्यात खडे/ काटे टोचून जखमा होतात तसेच खुरात चिखल रुतुन बसतो. अशावेळी खुरांचे निरीक्षण करुन उपचार करावा. विशेषत: शेळ्या मेंढ्या यांच्यामध्ये खुरकुज दिसून येते. त्यासाठी वाढलेली व कुजलेली खुरे काढून टाकावी. तसेच कॉपर सल्फेट किंवा फॉरमॉल्डिहाइड द्रावण असलेल्या उथळ हौदातुन मेढ्याचे संपूर्ण खुर बुडतील अशा सोडाव्यात. पशुवैद्यकाच्या सहाय्याने औषधोपचार करा.“““२) हवेतील आर्द्रता वाढली असल्याने जनावरांना सर्दी, फुफुसाचा दाह यांचा त्रास होण्याची संभावना असते. शक्यतो गोठे कोरडे ठेवा. गोठ्यात वाढलेले गवत, रिकामी पोती यांची बिछायत टाका. चुना भुरभुरावा. गोठ्यातील वातावरण ऊबदार ठेवा. यासाठी गोठ्यात धुरी करावी.“““३) चारा व खाद्य पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी.“““४) जनावरांचा साठवलेला चारा उदा. कडवा, मुरघास तसेच खाद्य विशेषत: शेंगदाणा पेंड, सरकी पेंड, गोळीपेंड यावर हिरवट काळसर बुरशी आली असेल तर असे खाद्य जनावरांना देऊ नका.“““४) माशा, डास यांचा प्रादुर्भाव टाळा.“““५) जनावराना उघड्यावर चरावयास पाठवु नये, तसेच त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यावे.“`1 shareLikeCommentShare