KVK DAHIGAON https://kvkdahigaon.org An Initiative of GOI, ICAR & SMGPSS Sun, 17 Nov 2024 11:59:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 214686105 ऊस रोपे विक्री https://kvkdahigaon.org/2024/11/17/%e0%a4%8a%e0%a4%b8-%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80/ https://kvkdahigaon.org/2024/11/17/%e0%a4%8a%e0%a4%b8-%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80/#respond Sun, 17 Nov 2024 11:58:19 +0000 https://kvkdahigaon.org/?p=498 ऊस रोपवाटिका कृषि विज्ञान केंद्र,दहिगाव ने को. 86032/को.एम. 0265 आणि

पायाभूत को. 86032/को.एम. 0265/पी. डी.एन.15012 ऊस रोपे विक्रीसाठी उपलब्ध संपर्क मो. 8805985205

]]>
https://kvkdahigaon.org/2024/11/17/%e0%a4%8a%e0%a4%b8-%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80/feed/ 0 498
कृषि विज्ञान केंद्र दहिगाव येथे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण संपन्न https://kvkdahigaon.org/2024/10/10/%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%97-6/ https://kvkdahigaon.org/2024/10/10/%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%97-6/#respond Thu, 10 Oct 2024 07:19:32 +0000 https://kvkdahigaon.org/?p=492

कृषि विज्ञान केंद्र दहिगाव – ने येथे मधुमक्षिका पालन प्रशिक्षणात जैविक व अजैविक ताण संशोधन केंद्र बारामती येथील शास्त्रज्ञ डॉ. संग्राम चव्हाण व डॉ. रवी कुमार यांची भेट

       मधमाशी ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पृथ्वीवरील जवळ जवळ ८७ टक्के वनस्पतीचे परागीभवन मधमाश्या द्वारे होते, सम्पूर्ण मानव जात मधमाश्यांनी परागीभवन केलेल्या व त्यापासून उत्पन्न झालेल्या अन्नावर अवलंबून आहे. या बाबीचे महत्व लक्षात घेऊन श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे, कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने यांच्या वतीने दिनांक ४ ते ८ ऑक्टोबर दरम्यान ग्रामीण युवकासाठी मधुमक्षिका पालन या विषयी प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रम आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्रजी घुले पाटील साहेब, मा. आमदार चंद्रशेखर घुले पाटील साहेब, सचिव श्री. अनिल शेवाळे, सहसचिव इंजी. रवींद्र मोटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या दूरदृष्टीतून दहिगाव ने येथे कृषि विज्ञान केंद्राची उभारणी झाली. हे केंद्र शेतकऱ्यांच्या पर्यंत नवीन शेती तंत्रज्ञान पोहच वण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. या केंद्रामार्फत शेतकरी, महिला, बेरोजगार ग्रामीण तरुण यांचेसाठी शेतीपूरक व्यवसाय व उद्योग अभिमुख प्रशिक्षणाचे आयोजन सातत्याने करत असते, त्याचाच एक भाग म्हणून मधुमक्षिका पालन व्यवसाया सबंधीची माहिती ग्रामीण युवकांना व्हावी या दृष्टीने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर प्रशिक्षणा दरम्यान महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील शास्त्रज्ञ व प्राध्यापक डॉ. लांडगे एस.ए. यांनी मधुमक्षिका पालनासाठी आवश्यक बाबी, चांगल्या मधमाशांची निवड इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. तसेच श्रीरामपूर येथील डॉ.औताडे यांनी मधुमक्षिका पालन उद्योगात माधुमक्षीकाची हाताळणी कशी करावी, आपत्कालीन परिस्थितीत मध माश्या वसाहती कश्या टिकवाव्यात, इत्यादी बाबतीत मार्गदर्शन केले. कोल्हापूर येथील मधुमक्षिका व्यवसाईक श्री. राहुल देओल यांनी स्थिर आणि अस्थिर मधुमक्षिका पालन कसे करावे, एकूणच त्यांनी व्यवसायाची सुरवात कशी केली त्यांना आलेल्या अडचणी त्यातून त्यांनी शोधलेल्या संधी आणि व्यवसाय उभारणी या संबंधी सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. कौशिक यांनी या केंद्रामार्फत राबवले जात असलेल्या विविध प्रशिक्षणाचा लाभ ग्रामणी युवकांनी घ्यावा असे आव्हानही केले. श्री. माणिक लाखे यांनी  मधुमक्षिका पालनचा शेती मध्ये विविध पिकात परागीभवनासाठी व्यवसाईक पद्धतीने कसा करावा या संबंधी मार्गदर्शन केले आणि दर प्रशिक्षणाचे संचालन उत्कृष्ठ पद्धतीने पार पाडले. श्री. राहुल पाटील यांनी मधुमक्षिका पालन व्यवसायाचे SWOT कसे करावे यासंबंधी मार्गदर्शन केले, तर श्री. बडधे सचिन यांनी मधुमक्षिका पालनातील व्यवसाईक संधी व या उदयोगाचे  अर्थशास्त्र समजाऊन दिले.

या कार्यक्रमाच्या सांगता समारंभांसाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचे बारामती येथील जैविक तण व्यवस्थापन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संग्राम चव्हाण, डॉ. रवी कुमार यांनी उपस्थित राहून उपस्थित प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. तसेच परिसरातील प्रगतीशील शेतकरी श्री. हुकम बाबा नवले, श्री. जाधव शंकर बिहारी, श्री. योगेश पाटील, श्री नामदेव चेडे यांनी ही मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार इंजी. राहुल पाटील यांनी केले.

]]>
https://kvkdahigaon.org/2024/10/10/%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%97-6/feed/ 0 492
शेती उत्पन्न वाढीसाठी व्यावसायिक दृष्टीकोन महत्त्वाचा – डॉ. कौशिक https://kvkdahigaon.org/2024/09/26/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d/ https://kvkdahigaon.org/2024/09/26/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d/#respond Thu, 26 Sep 2024 14:30:27 +0000 https://kvkdahigaon.org/?p=486 (पिंगेवाडीत शेतकरी – शास्त्रज्ञ परिसंवादाचे आयोजन)

श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने मार्फत शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी गावात कृषक समृद्धी सप्ताह निमित्ताने शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. शेतीचे नफ्या- तोट्याचे गणित जुळवून शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी  शेतीकडे बघण्याचा व्यावसायिक दृष्टीकोन विकसित करावा असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र दहिगाव- ने चे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कौशिक यांनी यावेळी केले.


भारतातील या कृषि विज्ञान केंद्राच्या स्थापनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल “कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताह” साजरा केला जात आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ग्रामस्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
उन्हाळी कांदा पिकाची रोपवाटिका ते काढणी चे नियोजन कसे असावे यावर विस्तृत अशी चर्चा डॉ. कौशिक यांनी शेतकऱ्यांसोबत केली. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ नारायण निबे यांनी ऊस पिक उत्पादन वाढीसाठी बेणे बदल करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. ऊसाचे खोडवा पीक घेताना पाचट व्यवस्थापन, बुडख्या छाटणी,  खत व्यवस्थापन यावर केव्हिके चे शास्त्रज्ञ सचिन बडधे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे इंजि. राहुल एस पाटील, प्रकाश बहिरट यांनीदेखील शेताऱ्यांशी संवाद साधून शेतीतील विकसित तंत्रज्ञानाच्या केव्हिके द्वारा आयोजित कृषि प्रदर्शनातील केव्हीके उत्पादनांची व यंत्रांची माहिती शेतकऱ्यांना दिली. यावेळी कृषि सहाय्यक बद्री लांडगे, प्रभात सीड चे सतीश तानवडे, गोमाता मिल्क चे संचालक दत्तात्रय तानवडे, युवा शेतकरी गंगाराम जाधव, अण्णासाहेब जाधव, रमेश तानवडे, नवनाथ घुले, शहादेव हजारे इ. उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या कापूस प्रक्षेत्राला तर तानवडे यांच्या गोमाता मिल्क प्रॉडक्ट प्रकल्पाला केव्हीके शास्त्रज्ञांनी भेट दिली

]]>
https://kvkdahigaon.org/2024/09/26/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d/feed/ 0 486
ई- न्यूज लेटर जानेवारी ते मार्च 2024 https://kvkdahigaon.org/2024/05/27/%e0%a4%88-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%9c-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%ae/ https://kvkdahigaon.org/2024/05/27/%e0%a4%88-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%9c-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%ae/#respond Mon, 27 May 2024 05:13:19 +0000 https://kvkdahigaon.org/?p=477 ई- न्यूज लेटर जानेवारी ते मार्च 2024

]]>
https://kvkdahigaon.org/2024/05/27/%e0%a4%88-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%9c-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%ae/feed/ 0 477
*कृषोत्सव निमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन*  https://kvkdahigaon.org/2024/01/03/%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4/ https://kvkdahigaon.org/2024/01/03/%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4/#respond Wed, 03 Jan 2024 10:12:38 +0000 https://kvkdahigaon.org/?p=468 *कृषोत्सव निमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन* 

साई सर्व्हिस, भारत पेट्रोलीयम कार्पोरेशन व कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन व आरोग्य शिबीर या सारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ. डॉ.नरेंद्रजी घुले पाटील, मा.आ. चंद्रशेखर घुले पाटील, मा.आ. पांडुरंग अभंग, पंचायत समिती, शेवगाव चे मा. सभापती डॉ. क्षितीज घुले पाटील, भारत पेट्रोलीयम कार्पोरेशन लि. अहमदनगरचे विक्री अधिकारी अमितकुमार राय व प्रादेशिक अभियंता रविराज दास हे प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना मा.आ. पांडुरंग अभंग यांनी शेतकऱ्यांना घटत चालेले शेती उत्पादन, नैसर्गिक आपत्ति, अवकाळी, पाण्याचे कमतरता, इ. शेतकर्‍यांना येणार्‍या समस्या   बाबतीत सरकारची धोरणे व शेती करतांनी आर्थिक व्यवस्थापन कसे करावे या विषयावर मार्गदर्शन केले.

          भारत पेट्रोलीयम कार्पोरेशन अहमदनगरचे विक्री अधिकारी अमितकुमार राय यांनी साई सर्व्हीस पेट्रोल पंप, दहिगाव-ने ला महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाचे उत्कृष्ट पूर्ण डिजिटल ऑटोमेशन पेट्रोल पंप सन्मान दिल्याचे जाहीर केले. तसेच या ठिकाणी सर्व ग्राहकांना शुद्धतेची हमी (प्यूअर फॉर शुअर) असल्याचे सांगितले. कंपनी तर्फे शेतकरी व ग्राहकासाठी पुरवल्या जाणा-या विविध सुविधा उत्कृष्ट गुणवत्तेचे असल्याबाबत साई सर्व्हिसचे अभिनंदन केले. त्याच बरोबर कृषोस्तव संकल्पनेच्या बाबत सर्व शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. तसेच केव्हीके दहिगाव-ने चे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शाश्वत शेती उत्पादन कसे घ्यावे याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रम प्रसंगी श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे सहसचिव रविंद्र मोटे व सर्व संचालक मंडळ, ह.भ.प.नवनाथ महाराज काळे, ह.भ.प.वैभव महाराज, इंडो फार्म ट्रेक्टरचे मिलिंद पाटील, प्रदीप नजन, तुषार आव्हाड, पेट्रोल पंप मॅनेजर अमोल शेळके, प्राथमिक आरोग्य केंद्र, दहिगाव-ने चे आरोग्य अधिकारी डॉ. धंनजय ठोकरे व सर्व कर्मचारी, जिजामाता नर्सिंग स्कूल दहिगाव-ने चे प्राचार्य व सर्व कर्मचारी तसेच कृषि विज्ञान केंद्राचे सचिन बडधे, नंदकिशोर दहातोंडे, डॉ. चंद्रशेखर गवळी, प्रकाश हिंगे, प्रकाश बहिरट, डॉ. प्रवीण देशमुख, वैभव नगरकर व परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

          या कार्यक्रमा दरम्यान परिसरातील कापूस, ऊस, अद्रक, इत्यादी पिकाचे विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी शंकर जाधव, गणेश जगदाळे, बाबासाहेब शिंदे, ज्ञानेश्वर धोंडे, वैभव माळवदे, संभाजी गवळी, तुकाराम चव्हाण यांचा साई सर्व्हिस पेट्रोल पंप दहिगाव-ने यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर १००० पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आरोग्य तपासणी व कृषि प्रदर्शनाचा लाभ घेतला.

          प्राध्यापक मकरंद बारगुजे, प्राध्यापक बाळासाहेब मंडलिक यांनी सूत्र संचालन केले तर कृषि विज्ञान केंद्राचे इंजि.राहुल पाटील यांनी प्रास्ताविक व माणिक लाखे यांनी आभार मानले.

]]>
https://kvkdahigaon.org/2024/01/03/%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4/feed/ 0 468
KVK Ahmednagar II News letter(Apr-June 23) https://kvkdahigaon.org/2023/10/26/kvk-ahmednagar-iidahigaon-news-letterapr-june-23/ https://kvkdahigaon.org/2023/10/26/kvk-ahmednagar-iidahigaon-news-letterapr-june-23/#respond Thu, 26 Oct 2023 13:18:02 +0000 https://kvkdahigaon.org/?p=452 KVK Ahmednagar II(Dahigaon) News letter(Apr-June 23)

]]>
https://kvkdahigaon.org/2023/10/26/kvk-ahmednagar-iidahigaon-news-letterapr-june-23/feed/ 0 452
कपाशी पिकावरील गुलाबी बोंड आळी व्यवस्थापन https://kvkdahigaon.org/2023/08/22/%e0%a4%95%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%8b/ https://kvkdahigaon.org/2023/08/22/%e0%a4%95%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%8b/#respond Tue, 22 Aug 2023 08:24:11 +0000 https://kvkdahigaon.org/?p=432 कपाशी पिकावरील गुलाबी बोंड आळी व्यवस्थापन _

अहमदनगर जिल्ह्यामध्ये  काही शेतकऱ्यांच्या वेळेवर लागवड झालेल्या कपाशीला फुले, बोंडे लागली असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते, फुले व काही प्रमाणात बोंडे लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले, बोंडे यावर अंडी घालतात, तसेच यावर्षी कपाशी पिकाची लागवड एकाच वेळी न होता टप्याटप्याने झालेली आहे, त्यामुळे किडीला सतत खाद्य उपलब्ध होत असल्याने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. म्हणून कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे जेणेकरून होणारा प्रादुर्भाव आतापासूनच निरीक्षणाद्वारे कमी करता येईल आणि पुढे होणारे नुकसान कमी करता येईल.

उपाय योजना : कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या आतील अळीसह तोडून जमा करून जाळून अथवा जमिनीत पुरून नष्ट कराव्यात. गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे हेक्‍टरी ५ या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या एक ते दीड फूट उंच लावावीत़. मोठ्या प्रमाणात पतंग जमा करून नष्ट करण्यासाठी एका एकर क्षेत्रामध्ये गुलाबी बोंडअळीचे ८ ते १० कामगंध सापळे लावावेत.

कपाशीचे शेतात पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी किमान २५ पक्षी थांबे लावावेत, म्हणजे पक्षी त्यावर बसून शेतातील अळया खाऊन नष्ट करतील. ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टीन १५०० पीपीएम ५०० मिली किंवा बिव्हेरिया बॅसियाना या  बुरशीयुक्त जैविक कीटकनाशकाची जमिनीत ओल व हवेत आर्द्रता असताना ८०० ग्रॅम प्रति एकर याप्रमाणात फवारणी करावी.

कामगंध सापळ्यामध्ये सलग तीन दिवस ८ ते १० पतंग प्रति सापळा किंवा १ अळी प्रति १० फुले किंवा १० बोंडे किंवा १० टक्के प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या किंवा बोंडे दिसून आल्यास पुढील पैकी एका रासायनिक कीटकनाशकांची ची फवारणी करावी.

प्रोफेनोफॉस ५० टक्के ४०० मिली प्रती एकर किंवा इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के ८८ ग्रॅम प्रती एकर किंवा प्रोफेनोफोस ४० टक्के अधिक सायपरमेथ्रीन ४ टक्के (पूर्व मिश्रित कीटकनाशक) ४०० मिली प्रती एकर आलटून पालटून फवारावे. या कीटकनाशकासोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते, सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये.

डोमकळी

कामगंध सापळा

]]>
https://kvkdahigaon.org/2023/08/22/%e0%a4%95%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%8b/feed/ 0 432
*कृषि विज्ञान केंद्र दहिगाव – ने यांना उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार* https://kvkdahigaon.org/2023/08/07/%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%97-5/ https://kvkdahigaon.org/2023/08/07/%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%97-5/#respond Mon, 07 Aug 2023 08:04:24 +0000 https://kvkdahigaon.org/?p=425 *कृषि विज्ञान केंद्र दहिगाव – ने यांना उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार*

    भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली चे कृषि तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था, पुणे  यांच्या वतीने आयोजित विभाग – ८ अंतर्गत वार्षिक  क्षेत्रीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २८ ते ३० जुलै २०२३ दरम्यान  छत्रपती संभागीनगर येथे करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात व गोवा या तीन राज्यातील  ८२ कृषि विज्ञान केंद्रे सहभागी झाली. यावेळी केव्हीके  दहिगाव – ने चे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी केलेल्या  सादरीकरणास उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

      यावेळी  श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र दहिगाव – ने यांनी सन २०२२ मध्ये केलेल्या  कामाचे  सादरीकरण प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी केली. त्यांनी केलेल्या सादरीकरणास डॉ. इंद्रमनी मिश्रा, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, डॉ. एस.के.रॉय, संचालक आईसीएआर – कृषि तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था, झोन ८, पुणे, डॉ. जगदीश राणे, संचालक, आईसीएआर – केंद्रीय कोरडवाहू फलोत्पादन संशोदन संस्था, बिकानेर, डॉ लाखनसिंग, माजी  संचालक आईसीएआर – कृषि तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था, झोन ८, पुणे, डॉ. डी.बी. देवसरकर, संचालक, विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या शुभहस्ते उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ. नरेंद्रजी घुले पाटील, मा.आ.श्री. चंद्रशेखर घुले पाटील, मा.आ.श्री. पांडुरंग अभंग, संस्थेचे सचिव श्री अनिल शेवाळे, श्री. रवींद्र मोटे व संस्थेच्या सर्व विश्वस्त मंडळाने  डॉ. कौशिक व केव्हीके च्या सर्व स्टाफ  यांचे अभिनंदन केले.

Read more
]]>
https://kvkdahigaon.org/2023/08/07/%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%97-5/feed/ 0 425
पंतप्रधान किसान सन्मान निधी निमित्ताने कृषि विज्ञान केंद्र दहीगाव-ने येथे शेतकरी परिसंवाद https://kvkdahigaon.org/2023/07/29/%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%a8/ https://kvkdahigaon.org/2023/07/29/%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%a8/#respond Sat, 29 Jul 2023 04:24:10 +0000 https://kvkdahigaon.org/?p=422 पंतप्रधान किसान सन्मान निधी निमित्ताने कृषि विज्ञान केंद्र दहीगाव-ने येथे शेतकरी परिसंवाद

दिनांक २७ जुलै २०२३ रोजी माननीय पंतप्रधान किसान सन्मान निधी चा चौदावा हप्ता वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने  व लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा यांचे संयुक्त विद्यमाने आडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञान याविषयी शेतकरी परिसंवादाचे आयोजन केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पदावरून  बोलताना माननीय आमदार डॉ. नरेंद्रजी घुले पाटील साहेब अध्यक्ष मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था यांनी उस उत्पादन वाढ  गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी केले. त्यांनी या कार्यक्रमाचा उद्देश सांगून उसात पिकत नवीन वाणाची लागवड करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. त्याचबरोबर बेणे बदल करण्यावर ही भर दिला त्यानंतर धाराशिव येथील प्रगतीशील ऊस उत्पादक श्री रावसाहेब गडदरे यांनी ऊस व्यवस्थापनातील बारकावे उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बात वाढवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. धाराशिव येथील दुसरे प्रगतिशील बागायतदार विजय पाटील यांनी स्वतः  निर्माण केलेल्या ट्रॅक्टरचलित खत पेरणी अवजाराबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. प्रकल्प संचालक आत्मा अहमदनगर चे श्री विलासराव नलगे व शेवगाव तालुका कृषि अधिकारी अंकुश टकले यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला.

या कार्यक्रमास ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार अभंग, ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे, काशिनाथ नवले, काकासाहेब शिंदे तसेच सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे  जनरल  मॅनेजर श्री रविन्द्र मोटे अणि शेतकी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कृषी विज्ञान केंद्राने उपलब्ध तंत्रज्ञान वर आधारित प्रदर्शनाची मांडणी केली होती. मान्यवरांच्या हस्ते परिसरातील महत्वाच्या पिकावरील सतत विचारले जाणाऱ्या प्रश्नांच्या माहिती पत्रकांचे क्यू आर स्कॅन कोडचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील प्रगतिशील ऊस उत्पादक अणि  DAESI पदवीके चे विद्यार्थी,  कृषी निविष्ठा विक्रेते मोठ्या संख्येने हजर होते

सदर कार्यक्रमध्ये शास्त्रज्ञ नारायण निबे, नंदकिशोर दहातोंडे, इंजी.राहुल पाटील, डॉ.चंद्रशेखर गवळी, प्रकाश बहिरट, प्रकाश हिंगे, अनिल देशमुख हे उपस्थित होते. माननीय पंतप्रधान किसान सन्मान निधी चा चौदावा हप्ता वाटपाच्या कार्यक्रमाच्या ऑनलाईन प्रक्षेपणाची व्यवस्था  प्रवीण देशमुख , कयू आर कोड केव्हीके चे संगणक प्रोग्रामर श्री वैभव नगरकर यांनी तयार केले होते तसेच सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री बडधे सचिन व आभार श्री. माणिक लाखे यांनी मानले.

]]>
https://kvkdahigaon.org/2023/07/29/%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%a8/feed/ 0 422
सेंद्रिय शेती विषयी २५ दिवसांचे (२१० तास) विनामूल्य प्रशिक्षण https://kvkdahigaon.org/2023/03/04/%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a5%a8%e0%a5%ab-%e0%a4%a6%e0%a4%bf/ https://kvkdahigaon.org/2023/03/04/%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a5%a8%e0%a5%ab-%e0%a4%a6%e0%a4%bf/#respond Sat, 04 Mar 2023 17:30:16 +0000 https://kvkdahigaon.org/?p=389 सेंद्रिय शेती प्रशिक्षण —————————————

भारत सरकारचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे अंतर्गत, भारतीय कृषि कौशल्य परिषद माध्यमातून कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने ता.शेवगाव, जि.अहमदनगर यांचेद्वारे ग्रामीण भागातील युवक व शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती विषयी २५ दिवसांचे (२१० तास) विनामूल्य कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी.

प्रशिक्षणाचे विषय :-

१. सेंद्रिय शेती

अधिक माहितीकरिता संपर्क

श्री. नारायण निबे

मो.क्र. ८८०५९८५२०५

श्री. माणिक लाखे

मो. क्र. ८३२९३८५४२०

श्री. प्रकाश बहिरट

मो. क्र.

९७६३२६७४३२

श्री. प्रकाश हिंगे

मो. क्र. ९८२२६५२८९९

सेंद्रिय शेती प्रशिक्षण वर्गासाठी फक्त २० जागा

प्रशिक्षण वर्ग दि.०६/०३/२०२३ ते ३१/०३/२०२३ या कालावधीत कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे घेण्यात येणार आहे. याकरिता वरील मोबाईल क्रमांकावर तात्काळ संपर्क करून आपला प्रवेश लवकर निश्चित करावा.

(टिप :- 1. प्रशिक्षण पूर्ण झालेनंतर भारत सरकारचे वतीने प्रमाणपत्र देण्यात येईल, त्याचा वापर शासकीय अनुदान व बँक कर्ज यासाठी करता येईल.

2. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वावर निश्चित करण्यात येईल.)

वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख

कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने

ता.शेवगाव, जि.अहमदनगर.

कार्यालय संपर्क :- ०२४२९-२७२०२०,२७२०३०

ई. मेल – kvkdahigaon@gmail.com

]]>
https://kvkdahigaon.org/2023/03/04/%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a5%a8%e0%a5%ab-%e0%a4%a6%e0%a4%bf/feed/ 0 389