fbpx
3
1
FhqTh9caEAIf31z
1-5
FhqTa2paAAEcG8Y
DSCN0550
IMG-20220917-WA0031
IMG-20220917-WA0037
1
3-1
previous arrow
next arrow

पंतप्रधान किसान सन्मान निधी निमित्ताने कृषि विज्ञान केंद्र दहीगाव-ने येथे शेतकरी परिसंवाद

पंतप्रधान किसान सन्मान निधी निमित्ताने कृषि विज्ञान केंद्र दहीगाव-ने येथे शेतकरी परिसंवाद

दिनांक २७ जुलै २०२३ रोजी माननीय पंतप्रधान किसान सन्मान निधी चा चौदावा हप्ता वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने  व लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा यांचे संयुक्त विद्यमाने आडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञान याविषयी शेतकरी परिसंवादाचे आयोजन केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पदावरून  बोलताना माननीय आमदार डॉ. नरेंद्रजी घुले पाटील साहेब अध्यक्ष मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था यांनी उस उत्पादन वाढ  गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी केले. त्यांनी या कार्यक्रमाचा उद्देश सांगून उसात पिकत नवीन वाणाची लागवड करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. त्याचबरोबर बेणे बदल करण्यावर ही भर दिला त्यानंतर धाराशिव येथील प्रगतीशील ऊस उत्पादक श्री रावसाहेब गडदरे यांनी ऊस व्यवस्थापनातील बारकावे उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बात वाढवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. धाराशिव येथील दुसरे प्रगतिशील बागायतदार विजय पाटील यांनी स्वतः  निर्माण केलेल्या ट्रॅक्टरचलित खत पेरणी अवजाराबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. प्रकल्प संचालक आत्मा अहमदनगर चे श्री विलासराव नलगे व शेवगाव तालुका कृषि अधिकारी अंकुश टकले यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला.

या कार्यक्रमास ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार अभंग, ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे, काशिनाथ नवले, काकासाहेब शिंदे तसेच सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे  जनरल  मॅनेजर श्री रविन्द्र मोटे अणि शेतकी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कृषी विज्ञान केंद्राने उपलब्ध तंत्रज्ञान वर आधारित प्रदर्शनाची मांडणी केली होती. मान्यवरांच्या हस्ते परिसरातील महत्वाच्या पिकावरील सतत विचारले जाणाऱ्या प्रश्नांच्या माहिती पत्रकांचे क्यू आर स्कॅन कोडचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील प्रगतिशील ऊस उत्पादक अणि  DAESI पदवीके चे विद्यार्थी,  कृषी निविष्ठा विक्रेते मोठ्या संख्येने हजर होते

सदर कार्यक्रमध्ये शास्त्रज्ञ नारायण निबे, नंदकिशोर दहातोंडे, इंजी.राहुल पाटील, डॉ.चंद्रशेखर गवळी, प्रकाश बहिरट, प्रकाश हिंगे, अनिल देशमुख हे उपस्थित होते. माननीय पंतप्रधान किसान सन्मान निधी चा चौदावा हप्ता वाटपाच्या कार्यक्रमाच्या ऑनलाईन प्रक्षेपणाची व्यवस्था  प्रवीण देशमुख , कयू आर कोड केव्हीके चे संगणक प्रोग्रामर श्री वैभव नगरकर यांनी तयार केले होते तसेच सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री बडधे सचिन व आभार श्री. माणिक लाखे यांनी मानले.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »